सानियाला दुहेरीतील सर्वोत्तम सातवे रॅँकिंग
भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने महिला दुहेरीत कारकीर्दीतील सर्वोत्तम असे सातवे रॅँकिंग मिळवले.
नवी दिल्ली- भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने महिला दुहेरीत कारकीर्दीतील सर्वोत्तम असे सातवे रॅँकिंग मिळवले.
नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानियाने महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. त्याचा फायदा तिचे रँकिंग वाढवण्यात झाला. 11 व्या रॅँकिंगवरून तिने सातव्या स्थानी झेप घेतली. 21 जून 2012 पर्यंत सानियाला ‘टॉप-10’ मधील रॅँकिंग कायम ठेवता आले तर लंडन ऑलिंपिकला दुहेरीसाठी तिला थेट प्रवेश मिळेल. एकेरीत मात्र सानियाची 106 व्या स्थानावरुन 111व्या रॅँकिंगवर घसरण झाली आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी जिंकणारा लिअॅँडर पेस सातव्या स्थानी कायम आहे. महेश भूपतीची 16व्या स्थानी घसरण झाली असून रोहन बोपण्णा 11 व्या रॅँकिंगवर कायम आहे.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा