PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मी माझ्या भूमिकेवर ठाम-शाहरुख मी माझ्या भूमिकेवर ठाम-शाहरुख ================================================================================ पीटीआय on 04 February, 2010 04:40:00 PM लंडन- आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना सहभागी करून घेण्याबाबत आपले मत कायम असून त्यावरुन जो काही वाद उदभवला आहे तो निष्कारण आहे, असे अभिनेता तसेच आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान याने स्पष्ट केले आहे. 'माय नेम इज खान' या चित्रपटाच्या प्रसिद्धीनिमित्त आयोजण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शाहरुख बोलत होता. या वेळी अभिनेत्री काजोल, दिग्दर्शक करण जोहर उपस्थित होते.