ऑफस्टम्पच्या बाहेर खेळल्यामुळेच अपयश-शास्त्री
भारताचे फलंदाज ऑस्ट्रेलिया दौ-यात सातत्याने शरीरापासून दूर ऑफस्टम्पच्या बाहेरचे चेंडू खेळल्याने अपयशी ठरले, अशी टीका भारताचे माजी कसोटीपटू आणि समालोचक रवी शास्त्री यांनी केली आहे.
अॅडलेड- भारताचे फलंदाज ऑस्ट्रेलिया दौ-यात सातत्याने शरीरापासून दूर ऑफस्टम्पच्या बाहेरचे चेंडू खेळल्याने अपयशी ठरले, अशी टीका भारताचे माजी कसोटीपटू आणि समालोचक रवी शास्त्री यांनी केली आहे. ‘‘पाचवा स्टम्प राहील या दिशेतले चेंडू भारताचे फलंदाज फटकवत होते त्यामुळे ते मालिकेत अनेकवेळा झेलबाद झाले. चेंडूवर लक्ष केंद्रित करणे त्यांना जमलेच नाही. फलंदाजी करण्यासाठी डोळे, डोके, खांदे सर्व काही योग्य स्थितीत असणे गरजेचे आहे. जेव्हा बाहेरचे चेंडू खेळायला जाता तेव्हा शरीरावरचे नियंत्रण सुटू शकते,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.
‘‘कोहलीने बाहेरचे चेंडू सोडून देण्यावर भर दिला म्हणून तो यशस्वी ठरला. चेंडूला योग्य न्याय देण्यात त्याला यश आले. बॅकफूट खेळ करण्यावर भर दिल्याचा कोहलीला फायदा झाला,’’ याकडे शास्त्री यांनी लक्ष वेधले.
‘‘बाउन्सर अचूकपणे खेळण्यासाठी त्यापद्धतीचा सराव असणे गरजेचे आहे. त्यातच सर्वच चेंडू बाउन्सर पद्धतीने येतील असे गृहित धरून बॅकफूटवर खेळ केला तर नुकसान होते. त्यातच भारताने पहिल्या दोन कसोटी गमावल्यानंतर फलंदाजांनी बाउन्सरची धास्ती जास्तप्रमाणात धरली. त्याची परिणती पुढील कसोटींमध्ये दिसली,’’ असे शास्त्री यांनी म्हटले.हरभजन म्हणतो, काळजीचे कारण नाही
जालंधर- भारताला ऑस्ट्रेलियाकडून व्हाइटवॉश स्वीकारावा लागला असला तरी काळजीचे कारण नाही, असे संघातून बाहेर असलेला ऑफस्पिनर हरभजन सिंगने म्हटले आहे. ‘‘जगातील कोणत्याही संघाला सेटबॅक बसू शकतो. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. आम्ही वर्ल्ड चॅँपियन असून लवकरच यशस्वी पुनरागमन करू,’’ असा विश्वास हरभजनने व्यक्त केला. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी काय मेहनत घेत आहेस, याबाबत त्याला विचारले असता, ‘‘भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी सध्या शक्य तेवढी मेहनत मी घेत आहे,’’ असे हरभजनने सांगितले.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा