पहिले पान | क्रीडाजगत | विश्वविक्रमासह दुलीप करंडक पश्चिम विभागाकडे

विश्वविक्रमासह दुलीप करंडक पश्चिम विभागाकडे

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

युसूफ पठाणच्या द्विशतकाच्या जोरावर पश्चिम विभागाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जागतिक विक्रमासह दुलीप करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

हैदराबाद-  युसूफ पठाणच्या द्विशतकाच्या जोरावर पश्चिम विभागाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जागतिक विक्रमासह दुलीप करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या सामन्यात पश्चिम विभागाने दक्षिण विभागावर तीन गडी राखून विजेतेपद पटकावले. 

दक्षिण विभागाने पहिल्या डावात ४०० धावा केल्या होत्या. मात्र पश्चिम विभागाचा पहिला डाव २५१ धावांतच संपुष्ठात आला होता. त्यानंतर दक्षिण विभागाने दुसरा डाव ३८६ धावांवर घोषीत केला. विजयासाठी ५३६ धावांचे आव्हान पश्चिम विभागाने सात गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले.

पश्चिम विभागाच्या या  विश्वविक्रमी विजयाचा शिल्पकार ठरला अष्ठपैलू खेळाडू युसूफ पठाण. पठाणने नाबाद २१० धावांच्या जोरावर पश्चिम विभागाने अंतिम दिवशी दुलीप करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दुलीप करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची पश्चिम विभागाची ही १६वी वेळ आहे.   

याआधी १९३८-३९ साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुस-या डावात इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६५४ धावा केल्या होत्या. तर १९४८-४९ साली मुंबई संघाविरुद्ध खेळताना महाराष्ट्राच्या संघाने दुस-या डावात ६०४ धावा केल्या होत्या. मात्र हे दोन्ही सामन्यांचा निकाल लागला नव्हता.  

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0