पहिले पान | क्रीडाजगत | चौकशीसाठी आयसीसीची स्वतंत्र समिती

चौकशीसाठी आयसीसीची स्वतंत्र समिती

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूयॉर्क- स्पॉट फिक्सिंगप्रकरणी नव्हे तर आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या तिन्ही क्रिकेटपटूंवर बंदी घालण्यात आलेली आहे. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांच्या चौकशीसाठी आयसीसी स्वतंत्र समिती नियुक्त करणार असून समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. तत्पूर्वी, आरोप असलेल्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना समितीसमोर त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळेल, असे आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सांगितले.

 ‘‘आयसीसीने स्पॉट फिक्सिंगप्रकरणी कुठल्याही क्रिकेटपटूवर बंदी घातलेली नाही. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांतर्गत संशयित क्रिकेटपटूंची चौकशी केली जात आहे. तसेच त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आयसीसीने तिन्ही क्रिकेटपटूंना नोटिस पाठवली आहे. मात्र ही नोटिस म्हणजे बंदी नव्हे. या नोटिशीने त्याप्रत्येक क्रिकेटपटूला त्याची बाजू मांडण्याची संधी आहे. संबंधित क्रिकेटपटू दोषी नसतील तर त्यांनी तसे सिद्ध करावे,’’ असे पवार यांनी सांगितले. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंवर घातलेल्या बंदीविषयी पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चायुक्त वाजिद शमसुल हसन यांनी आयसीसीचा निर्णय हे पाकिस्तानविरुद्धचे कट कारस्थानअसल्याचा आरोप करत आयसीसी अध्यक्ष पवार यांना लक्ष्यकेले होते. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमातील कलम-5 नुसार अँटी करप्शन ट्रायब्युनलच्या स्वतंत्र समितीसमोर सलमान बट, मोहंमद आसिफ आणि मोहंमद आमिरला आपली बाजू मांडता येणार आहे.

श्रीलंकेचा क्रिकेटपटू बुकीच्या संपर्कात

 लंडन : आयसीसीचे भ्रष्टाचार विरोधी पथक श्रीलंकेच्या एका सिनियर क्रिकेटपटूंवर करडी नजर ठेऊन आहे. या क्रिकेटपटूचे बुकींशी संबंध वाढत असल्याची तक्रार त्याच्याच अन्य सहका-यांनी कर्णधार कुमार संगकाराकडे केली. त्यानंतर संगकाराने संघ व्यवस्थापनाच्या लक्षात ही बाब आणून दिली आहे. श्रीलंका पोलिसांनी चौकशी केली असली तरी त्याक्रिकेटपटूवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे द गार्डियनदैनिकाने म्हटले आहे. श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी आयसीसीच्या आचारसंहितेनुसार भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या अधिका-यांना त्याक्रिकेटपटूविषयी माहिती पुरवली आहे. दरम्यान, श्रीलंका बोर्डाने एकूण प्रकरणी कुठलेही भाष्य केलेले नाही. 2009मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपपासून भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या अधिका-यांची त्याक्रिकेटपटूंवर नजर आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0