पहिले पान | क्रीडाजगत | शॉन मार्श, हॅडिन वनडे संघातून आउट

शॉन मार्श, हॅडिन वनडे संघातून आउट

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

फॉर्मात नसलेला आघाडीच्या फळीतील शॉन मार्श आणि यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनला ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघातून वगळण्यात आले आहे

मेलबर्न- फॉर्मात नसलेला आघाडीच्या फळीतील शॉन मार्श आणि यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनला ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघातून वगळण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील खराब कामगिरीमुळे दोघांना बसवण्यात आले. पाच फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी यजमान संघांची निवड सोमवारी करण्यात आली.  

14 सदस्यीय संघात यष्टिरक्षक म्हणून अपेक्षेप्रमाणे मॅथ्यू वेडला स्थान देण्यात आले. फलंदाज पीटर फॉरेस्ट हा एकमेव नवा चेहरा आहे. नुकत्याच संपलेल्या बिग बॅश टी-२०मध्ये त्याने चमक दाखवली. कसोटी मालिका गाजवणाऱ्या रिकी पॉँटिंग आणि माइक हसी या सिनियर्सनाही वनडे संघात कायम ठेवण्यात आले आहे. सिनियर ब्रेट लीमुळे तेज मारा अधिक संतुलित झाला आहे. त्याच्यासह तेज गोलंदाज मिचेल मार्श, अष्टपैलू डॅनियल ख्रिस्तियन आणि तेज गोलंदाज क्लिंट मॅककाय या डोमेस्टिक मोसम गाजवणा-यांना संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया संघ : मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पॉँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनियल ख्रिस्तियन, डेव्हिड हसी, माइक हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हियर डोहर्टी, क्लिंट मॅककाफ, मिच मार्श.      

हॅडिनला वगळले की विश्रांती?

फॉर्मात नसलेल्या हॅडिनला वगळले की विश्रांती दिली, हे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला तितकेसे स्पष्ट करता आलेले नाही. एकीकडे फॉर्म नसल्याचे सांगतानाच,‘‘हॅडिन कसोटीसाठी योग्य यष्टिरक्षक आहे. परिणामी 2013  मध्ये होणा-या अ‍ॅशेस मालिकेत त्याची संघाला गरज आहे. अति क्रिकेटचा फटका बसून नये, म्हणून त्याला पहिल्या तीन सामन्यांतून विश्रांती देण्यात आली,’’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (सीए) सिलेक्टर जॉन इन्वेरॅरिटी यांनी सांगितले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0