पहिले पान | क्रीडाजगत | भारतीय संघात फूट?

भारतीय संघात फूट?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारतीय क्रिकेट संघात फूट पडली असून धडाकेबाज फलंदाज वीरेंदर सेहवागमुळे भारतीय गोटात शीतयुद्ध सुरु असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या 'हेरॉल्ड सन' या वृत्तपत्राने केला आहे.

नवी दिल्ली- परदेशातील पराभवाचे सत्र चालूच असताना टीम इंडीयाला आता वेगळ्याचा विवादाला सामोरे जावे लागत आहे. भारतीय क्रिकेट संघात फूट पडली असून धडाकेबाज फलंदाज वीरेंदर सेहवागमुळे भारतीय गोटात शीतयुद्ध सुरु असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या 'हेरॉल्ड सन' या वृत्तपत्राने केला आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमे असा दावा जरी करत असली तरी टीम इंडियाचे मानसिक खच्चीकरण करण्याचा ऑस्ट्रेलियन माध्यमांचा हा डाव असल्याची चर्चा आहे.

 

भारतीय संघातील काही खेळाडूंना सेहवाग कर्णधार असावा असे वाटते तर काहींचे मत हे कर्णधार महेंद्रसिंह ढोणीच असावा असे मत असल्याचे या वृत्तपत्रात म्हटले आहे.याशिवाय माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे भारतीय संघातील युवा खेळाडूंवर वरिष्ठ खेळाडूंचा दबाव असतो असेही म्हटले आहे.

 

दोन्ही कसोटीमध्ये सपाटून मार खाल्यानंतर भारतीय संघावर चोहोबाजूंनी टिका होत असून त्यामध्ये आता ऑस्ट्रेलियन माध्यमांचीही भर पडली आहे.

 

कामगिरी उंचावण्याबरोबरच टिकाकारांना चोख उत्तर देण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर असेल.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0