तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
ऑस्ट्रेलियामध्ये पुढील महिन्यात होणा-या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून सचिन तेंडुलकरचे संघात पुनरागमन झाले आहे.
चेन्नई- भारत,ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये पुढील महिन्यात होणा-या तिरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची रविवारी घोषणा झाली. वीक्रमवीर सचिन तेंडुलकरने दहा महिन्यानंतर वनडे संघात पुनरागमन केले असून वेगवान गोलंदाज इरफान पठाण व प्रवीण कुमार यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, मुंबईकर अजिंक्य रहाणेला संघातून वगळण्यात आले आहे.
निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत यांनी भारतीय संघाची घोषणा केली. इंग्लंड मालिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात महाशतक पूर्ण करण्यास अपयशी ठरलेल्या वीक्रमवीर सचिन तेंडुलकरला उर्वरीत कसोटी सामन्यात जरी महाशतक जमले नाही तरी, त्याला वनडे मालिकेत संधी आहे. अपेक्षेप्रमाणे युवा खेळाडूंना एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. प्रवीण कुमारने दुखापतीतून सावरत संघात स्थान मिळविले आहे. याशिवाय इरफान पठाणनेही संघात पुनरागमण केले आहे, मात्र मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग व फिरकीपटू हरभजन सिंग पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्यांना वगळण्यात आले आहे. युवराज सिंगच्या जागी कोलकात्याच्या मनोज तिवारीला कायम ठेवण्यात आले आहे. हरभजन ऐवजी युवा फिरकीपटू आर.अश्विन व राहुल शर्मा यांना संघात स्थान दिले आहे. तर वेगवान गोलंदाजांची धुरा झहीर खान, प्रवीण कुमार, उमेश यादव यांच्यावर सोपवण्यात येईल. तर दुसरा यष्टीरक्षक म्हणून पार्थिव पटेलला संघात स्थान दिले आहे.
संघ - महेंद्रसिंह ढोणी (कर्णधार), सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, रवींद्र जाडेजा, आर. अश्विन, राहुल शर्मा, विनय कुमार, इरफान पठाण, झहीर खान, प्रवीण कुमार, उमेश यादव, मनोज तिवारी आणि पार्थिव पटेल.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा