सचिनला मानसोपचार तज्ज्ञाची गरज- लतिफ
महाशतकाच्या दबावात असलेल्या विक्रमवीर सचिन तेंडुलकर याला मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, असे मत पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार रशिद लतिफ याने व्यक्त केले.
कराची- महाशतकाच्या दबावात असलेल्या विक्रमवीर सचिन तेंडुलकर याला मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, असे मत पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार रशिद लतिफ याने व्यक्त केले.
"सचिन दबावात आहे यात शंका नाही.हे जरी त्याला मान्य नसले तरी महाशतकाच्या उंबरठ्यावर आल्याने त्याच्यावर मानसिक ताण आहेच. त्याच्यावरील हा ताण कमी करण्यासाठी त्याने क्रीडा मानसोपचार तज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा' असे लतिफ म्हणाला.
मधल्या फळीत सचिन उत्तम फलंदाजी करत असून फक्त मानसिक दबावामुळेच तो महाशतकापासून चुकत असल्याचेही लतिफने नमूद केले.
सचिनचे महाशतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतच होईल असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा