पहिले पान | क्रीडाजगत | भारतीय संघाच्या पराभवाचा सिलसिला सुरुच

भारतीय संघाच्या पराभवाचा सिलसिला सुरुच

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही भारतीय संघाने कसोटी क्रिकेट मालिकेतील पराभवाचा सिलसिला सुरुच ठेवला आहे.

सिडनी- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 31 धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेले 172 धावांचे लक्ष्य गाठताना भारताला केवळ 140 धावा करता आल्या. कसोटी मालिकेतील पराभवामुळे टीकेचे लक्ष्य बनलेल्या भारतीय संघाने टी-20 सामन्यातही निराशा केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलिया दौ-यातील पहिल्या विजयासाठी धडपडणा-या भारतीय संघ कसोटी मालिकेतील पराभवातून अद्याप बाहेर पडलेला नाही असेच चित्र या सामन्यात दिसले. कसोटी मालिकेतील व्हाइटवॉशमुळे दडपणाखाली खेळणा-या भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने आक्रमक सुरुवात केली. डेव्हिड वॉर्न आणि मॅथ्यू वेड यांनी पहिल्या विकेटसाठी 38 धावा केल्या. त्यानंतर आर.विनय कुमारने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने  डेव्हिड वॉर्नर बाद केले. वॉर्नरने 14 चेंडूत दोन षटकार आणि एक चौकारच्या मदतीने २५ धावा केल्या. त्यानंतर वेडने फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने केवळ 34 चेंडूत 50 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का आर.आश्विनने दिला. त्याने ट्रेव्हिस बर्टला 17 धावांवर बाद केले. त्यानंतर वेड आणि डेव्हिड हसी यांनी फटकेबाजी सुरुच ठेवली. वेडला सुरेश रैनाने 73 धावांवर बाद केले. डेव्डिड हसीने 30 चेंडूत ४२ धावा केल्या. भारताकडून आर. अश्विन, आर. विनय कुमार, राहुल शर्मा आणि सुरेश रैना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

भारताच्या डावाची सुरुवात वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी केली. मात्र सेहवागला मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयश आले. ब्रेट लीने त्याला चार धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि गंभीर यांनी आक्रमक खेळी केली. मात्र ही जोडी मिचेल मार्शने फोडली. त्याने गंभीरला 20 धावांवर बाद केले. त्यानंतर लगेच कोहली 22 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या रोहित शर्माला भोपळाही फोडता आला नाही. त्याला डेव्हिड हसीने बाद केले. त्यानंतर रैना-ढोणी जोडीकडून अपेक्षा होत्या. मात्र रैनाला  डॅनियल ख्रिस्तियनने 14 धावांवर बाद केले.तर त्या पाठोपाठ रवींद्र जडेजाला ख्रिस्तियनने सात धावांवर बाद केले. कर्णधार ढोणीने नाबाद 48 धावा केल्या तर आर. अश्विन नाबाद 15 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल ख्रिस्तियन आणि डेव्हिड हसी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर ब्रॅड हॉग आणि ब्रेट ली यांनी एक गडी बाद केले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0