PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: भूपती-मिर्नी अमेरिकन ओपनच्या दुस-या फेरीत भूपती-मिर्नी अमेरिकन ओपनच्या दुस-या फेरीत ================================================================================ पीटीआय on 02 September, 2010 06:25:00 PM न्यूयॉर्क- भारताचा आघाडीचा टेनिसपटू महेश भूपती आणि त्याचा बेलारुसचा जोडीदार मॅक्स मिर्नी यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या दुस-या फेरीत प्रवेश केला आहे. भूपती-मिर्नी यांनी फ्रन्सच्या जोडीचा 6-1, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि त्याची चीनची जोडीदार जी यान याचा पहिल्या फेरीत पराभव झाला. अमेरिका आणि फ्रान्सच्या जोडीने त्यांचा 2-6, 4-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. बोपन्नाने बुधवारी पुरुष दुहेरीच्या दुस-या फेरीत प्रवेश केला आहे.