PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: अमेरिकन ओपन- बोपण्णा,कुरेशी उपांत्य फेरीत अमेरिकन ओपन- बोपण्णा,कुरेशी उपांत्य फेरीत ================================================================================ पीटीआय on 08 September, 2010 08:50:00 PM न्यूयॉर्क- भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा पाकिस्तानचा साथीदार ऐसाम उल-हक कुरेशी यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बोपण्णा-कुरेशी यांनी वेस्ली मूडी आणि डिक नॉर्मन या जोडीचा पराभव केला. बोपण्णा-कुरेशी यांनी मूडी-नॉर्मन जोडीचा 7-5, 7-6(2) अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या जोडीने प्रथम ग्रँड स्लॅमस्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.