PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: सानियाचा दुस-या फेरीत पराभव सानियाचा दुस-या फेरीत पराभव ================================================================================ पीटीआय on 01 September, 2010 11:45:00 PM न्यूयॉर्क- भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाचा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील दुस-या फेरीत पराभव झाला आहे. रशियाच्या एनास्टेशिया पाव्हालुचेंकोव्हीयाने सानियाचा 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सानिया मिर्झाचा पराभव झाल्यामुळे अमेरिकन ओपनच्या एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्ठात आले आहे. सानिया पूर्वी पुरुष दुहेरीत लिएडर पेस आणि त्याचा साथीदार लुकास डलुहीचे आव्हान संपुष्ठात आले आहे. मात्र रोहन बोपन्ना आणि त्याचा पाकिस्तानचा साथीदार एसाम अल कुरेशी या जोडीने दुस-या फेरीत प्रवेश केल्याने भारताचे पुरुष दुहेरीतील आव्हान कायम आहे.