पराभवाला माझे अपयश कारणीभूत- मुरली
क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध झालेल्या पराभवाला आपले अपयश कारणीभूत आहे, अशी कबुली श्रीलंकेचा ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन याने दिली.
कोलंबो- क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध झालेल्या पराभवाला आपले अपयश कारणीभूत आहे, अशी कबुली श्रीलंकेचा ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन याने रविवारी दिली. मुरलीधरनचा हा शेवटचा एकदिवसीय सामना होता. या सामन्यात आपण स्वतः आणि सूरज रणदीव विकेट्स घेऊ शकलो नाही. याचा परिणाम म्हणूनच भारताने 275 धावांचे लक्ष्य सहज साध्य केले, असे मुरली म्हणाला.
वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुरलीधरनला आठ षटकांत एकही विकेट मिळाली नाही. रणदीवलाही या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही.
मलिंगाने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. मात्र स्पिनर्स अपयशी ठरल्याने भारताच्या मधल्या फळीला खिंडार पाडणे श्रीलंकेला शक्य झाले नाही, असे मुरलीने स्पष्ट केले.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा