कप दॅट काउंट्स

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

श्रीलंकेला 274 धावा करू दिल्या म्हणून त्या मधल्या इंटर्वलमध्ये भारतीय संघाला शिव्या देणारे लाखो होते. प्रत्यक्षात त्या सुरेख खेळपट्टीवर श्रीलंकेला 300 धावा करता आल्या नाहीत, याबद्दल युवराज, रैना, कोहली यांचे आभार मानले पाहिजेत. झहीर, श्रीशांत हेही डीप फील्डमध्ये ब-यापैकी सावध होते. तीच गोष्ट 30 यार्ड वर्तुळात सचिन, हरभजन यांची. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी ऑस्ट्रेलियाला 260 धावांमध्ये, पाकिस्तानला 229 धावांमध्ये आणि श्रीलंकेला 274 धावांमध्ये रोखलं. प्रत्येक सामन्यात एरवी भारतानंच 20-30धावा अधिक दिल्या असत्या, तरी कोणी काही बोललं नसतं. पण असा ढिसाळपणा परवडणार नाही हे भारतीय संघाला वेळीच उमगलं. पाकिस्ताननं त्यांचा वर्ल्डकप ‘ड्रॉप’ केला. भारतानं ते होऊ दिलं नाही.

अनेक भुतं वानखेडेवर गाडून टीम इंडियानं वर्ल्डकप दुस-यांदा आणि दिमाखात जिंकला. कणखर आणि खमक्या कर्णधार मिळाल्यास भारतीय संघाचा परफॉरमन्स नेहमीच चांगला होतो हे यापूर्वी 1983, 2003 वर्ल्डकप स्पर्धामध्ये दिसून आलंच होतं. या स्पर्धेत भारताची कामगिरी सुरुवातीच्या टप्प्यात चांगली नव्हतीच. पण योग्य वेळी ती उंचावणे यालाच महत्त्व असतं, असं ढोणी सांगत होता. वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा साखळी सामना जिंकून भारत टॉप गियरमध्ये गेला. प्रथम ऑस्ट्रेलियाविरुद्ध, मग पाकिस्तानविरुद्ध आणि अखेरीस श्रीलंकेविरुद्ध. प्रत्येक संघाविरुद्ध तसाच परफॉरमन्स आवश्यक होता. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांनी भारताची मोठीच मदत केली, असं म्हणावं लागेल. कारण हे दोन प्रतिस्पर्धी उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरीत मिळाल्यामुळे खडतर लढतींची प्रॅक्टिस आपोआप मिळाली. पाकिस्तानविरुद्ध अपेक्षांच्या दडपणाचा मुकाबला करण्याचं अतिरिक्त ट्रेनिंग मिळालं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात, लक्ष्याचा पाठलाग करता येतो याची खातरजमा झाली. पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी परजली गेली. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मैदानावरची पहारेदारी अर्थात फील्डिंग किंवा क्षेत्ररक्षण धारदार करता आलं. जे अत्यंत महत्त्वाचं ठरलं. श्रीलंकेला 274 धावा करू दिल्या म्हणून त्या मधल्या इंटर्वलमध्ये भारतीय संघाला शिव्या देणारे लाखो होते. प्रत्यक्षात त्या सुरेख खेळपट्टीवर श्रीलंकेला 300 धावा करता आल्या नाहीत, याबद्दल युवराज, रैना, कोहली यांचे आभार मानले पाहिजेत. झहीर, श्रीशांत हेही डीप फील्डमध्ये ब-यापैकी सावध होते. तीच गोष्ट 30 यार्ड वर्तुळात सचिन, हरभजन यांची. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी ऑस्ट्रेलियाला 260 धावांमध्ये, पाकिस्तानला 229 धावांमध्ये आणि श्रीलंकेला 274 धावांमध्ये रोखलं. प्रत्येक सामन्यात एरवी भारतानंच 20-30धावा अधिक दिल्या असत्या, तरी कोणी काही बोललं नसतं. पण असा ढिसाळपणा परवडणार नाही हे भारतीय संघाला वेळीच उमगलं. पाकिस्ताननं त्यांचा वर्ल्डकप ड्रॉपकेला. भारतानं ते होऊ दिलं नाही.

 ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजांनी पुढाकार घेतला होता. फायनलमध्ये फलंदाजांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित निभावली. भारतीय फलंदाजी जगात सध्या सर्वाधिक बलवान आहे. या वर्ल्डकपच्या आणि भारताच्याही पहिल्या सामन्यात फलंदाजांनी 370 धावा केल्या. ज्या वर्ल्डकपच्या उद्घाटनाच्या सामन्यात सर्वाधिक ठरल्या. वर्ल्डकपच्या अखेरच्या सामन्यात भारतानंच 274 धावांचा यशस्वी पाठलाग केला. जो पुन्हा एक विक्रम ठरला. सचिन खेळला नाही, सेहवाग खेळला नाही. पण आपली फलंदाजी म्हणजे केवळ सचिन-सेहवाग नाही हे कुठं तरी दिसायला हवं होतं. भारताचा पहिला विश्वविजय क्रिकेटच्या पंढरीत साकारला गेला. दुसरा विश्वविजय भारतीय क्रिकेटच्या पंढरीत म्हणजे मुंबईत साकारला गेला. मुंबईचं महत्त्व यानिमित्तानं तरी लोकांना कळायला हवं होतं. श्रीलंकेविरुद्ध फायनलमध्ये आपला रेकॉर्ड चांगला नव्हता. तो रेकॉर्ड वर्ल्डकपमध्ये बिनमहत्त्वाचा आहे, हे भारतानं आपल्या भावंडाला नीटच समजावलं. टॉसच्या वेळी कुमार संगकाराने मनाचा मोठेपणा दाखवला नाही. ढोणीनं तो दाखवला. श्रीलंकेचा कर्णधार हा कधीच खिलाडू वृत्तीसाठी ओळखला जात नाही. ढोणीनं त्याच्या स्टाइलमध्ये, शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून लंकेला मूहतोड जबाब दिला. सचिन तेंडुलकर, ढोणीचा भारत रडय़ा डावपेचांमध्ये गुंतून पडत नाही. प्ले युअर क्रिकेट हार्ड अँड फेयर हा आता आपला मंत्र आहे. काही वेळा त्यातून पराभवही पाहावा लागतो. पण अखेरीस एखादा वर्ल्डकपही जिंकता येतो, हे टीम इंडियानं दाखवून दिलं. महेंद्रसिंग ढोणीला क्रिकेटप्रेमींच्या कोर्टात हाजिर व्हायला याच स्तंभात आम्ही सांगितले होते. ढोणीनं त्याला निर्दोष सिद्ध केलंय. त्यामुळे ढोणी बाइज्जत बरी झालेला आहे. आणखी काय हवं होतं? हाच कप तर खरा. कप दॅट काउंट्स!

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0