04 April, 2011 11:08:00 AM
श्रीलंकेला 274 धावा करू दिल्या म्हणून त्या मधल्या इंटर्वलमध्ये भारतीय संघाला शिव्या देणारे लाखो होते. प्रत्यक्षात त्या सुरेख खेळपट्टीवर श्रीलंकेला 300 धावा करता आल्या नाहीत, याबद्दल युवराज, रैना, कोहली यांचे आभार मानले पाहिजेत. झहीर, श्रीशांत हेही डीप फील्डमध्ये ब-यापैकी सावध होते. तीच गोष्ट 30 यार्ड वर्तुळात सचिन, हरभजन यांची. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी ऑस्ट्रेलियाला 260 धावांमध्ये, पाकिस्तानला 229 धावांमध्ये आणि श्रीलंकेला 274 धावांमध्ये रोखलं. प्रत्येक सामन्यात एरवी भारतानंच 20-30धावा अधिक दिल्या असत्या, तरी कोणी काही बोललं नसतं. पण असा ढिसाळपणा परवडणार नाही हे भारतीय संघाला वेळीच उमगलं. पाकिस्ताननं त्यांचा वर्ल्डकप ‘ड्रॉप’ केला. भारतानं ते होऊ दिलं नाही.
02 April, 2011 12:05:00 PM
वर्ल्डकपमध्ये कसं खेळावं नि काय टाळावं, याचं ट्रेनिंग देणारी एखादी ग्लोबल अॅकॅडमी सचिननं मुंबईत वगैरे सुरू केली तर धो-धो प्रतिसाद मिळेल.2007 चा अपवाद आणि काही प्रमाणात 1999 चा अपवाद वगळल्यास सगळ्या स्पर्धामध्ये सचिन चमकून गेला आणि त्याची विकेट ब-याचदा भारताचीही विकेट घेऊन गेली. सचिनविना वर्ल्डकप ही कल्पना करण्याचंही एका पिढीनं सोडून दिलं होतं.
...
01 April, 2011 10:10:00 AM
भारत आणि पाकिस्तान या बड्या आशियाई देशांमध्ये क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षकांना प्रतिष्ठा नाही. चांगले फलंदाज भारताकडे, चांगले गोलंदाज पाकिस्तानकडे आणि चांगले क्षेत्ररक्षक कोणाकडेच नाहीत, असं समीकरण दोन्ही देशांतली मंडळी जणू गृहित धरून चालतात. जिथं प्रतिष्ठा नाही, त्या क्षेत्रात मेहनत घेऊन सुधारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण क्षेत्ररक्षणाद्वारे जिंकता येते किंवा हार होऊ शकते हे यांच्या गावीही नसतं....
29 March, 2011 12:02:00 PM
ढोणी आणि आफ्रिदी यांच्यावर दडपण अधिक आहे हे मान्य करावंच लागेल. कारण दोन्ही कर्णधारांना चाहत्यांच्या अवास्तव अपेक्षांचं भान ठेवावं लागतं. पण चौघांपैकी आफ्रिदी आणि संगकारा यांची मैदानावरची कामगिरी अव्वल दर्जाची होतेय. आफ्रिदी 21 विकेट्स घेऊन गोलंदाजांमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे फलंदाजीत फार धावा होत नाहीत ही चिंता त्याला सतावत नसेल. ...
28 March, 2011 03:30:00 AM
मानसिक दृष्टय़ा इंग्लिश क्रिकेटपटू इतके कमकुवत असतील, तर त्यांनी दौरे बाजूला ठेवून प्रथम कौन्सेलिंगसारखे गंभीर कार्यक्रम हाती घ्यावेत. अॅशेस मालिका, दक्षिण आफ्रिकेचा दौरा असला, की सगळे कसे पूर्ण ताकदीनं खेळतात. उपखंडाकडे विमान वळलं की पोटात, मेंदूत ढवळाढवळ सुरू होते काय?...
27 March, 2011 10:30:00 AM
एक टीम म्हणून सर्वाधिक एकजिनसीपणानं खेळणारा तो संघ असतो. 1975, 1979, 1992, 1999, 2007 आणि आता 2011 या स्पर्धामध्ये न्यूझीलंड एक सेमीफायनलिस्ट आहे. 1992मध्ये ते सहयजमान होते. त्यावेळी त्यांनी सलग सात विजय मिळवण्याचा पराक्रम केला होता....
26 March, 2011 11:47:00 AM
प्रसंग कसोटी सामन्याचा असो वा वनडेतला. तिसरा क्रमांक कधीच म्हणजे कधीच चुकला नाही. सामना मोहालीत असो की वेलिंग्टनमध्ये, हेडिंग्लेला असो की मेलबर्नला. त्याचा तो क्रमांक बदलण्याचं कधी पाँटिंगला वाटलं नाही आणि तो बदलावा असं सुचवण्याचं धाष्टर्य़ ऑस्ट्रेलियन बोर्ड किंवा निवड समितीलाही कधी झालं नाही. ...
25 March, 2011 05:30:00 AM
या संघानं आता खरोखरच काहीतरी भरीव जिंकण्याची वेळ आलेली आहे. कारण एकीकडे ऑस्ट्रेलिया आणि दुसरीकडे भारत यांच्यामुळे क्रिकेटचं होणारं धृवीकरण थांबवण्याची ताकद दक्षिण आफ्रिकेत आहे. ...
24 March, 2011 11:45:00 AM
गेल्या तीन वर्षात कांगारूंनी आपल्याला एका वनडे मालिकेत 4-2 असं हरवलेलं आहे. अहमदाबादला आपण सलग चार सामने यापूर्वी गमावलेले आहेत. त्यामुळे अहमदाबाद आणि ऑस्ट्रेलिया अशा खतरनाक काँबिनेशनशी मुकाबला आहे.
...
23 March, 2011 11:01:00 AM
पॉवर प्लेमध्ये बहुतेक क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या आत येतात आणि आणि त्यामुळे स्कोअरिंगला संधी मिळते. पण आपण तो फारच गांभीर्यानं घेतो आणि कृत्रिम, तकलादू आक्रमकपणा अंगी भिनवतो. पॉवर प्लेमध्ये पाच-सहाच्या रेटनं धावा निघाल्यानंतरही आपल्याला कोणी फासावर लटकवणार आहे का?
...