पहिले पान | क्रीडाजगत | रन दणादण | संजय मोने यांचा 'फ्री हिट'

संजय मोने यांचा 'फ्री हिट'

image

अभिनंदन!आभार!!

03 April, 2011 12:30:00 PM
ढोणीची खेळी आज भारताला कप जिंकून देऊन गेली. आपण सगळी स्पर्धा ढोणीच्या कुशल कप्तानी डावपेचांनी जिंकलो. ज्याला माणूस म्हणून भावना आहेत त्याला आजचा दिवस बरेच दिवस स्मरणात राहील.
image

फायनलसाठी शुभेच्छा!

31 March, 2011 11:18:00 AM 261 धावा या जरी या स्पर्धेच्या एकंदरीत लौकिकाला साजेशा नव्हत्या तरी माझ्या मते त्या खूप होत्या. निदान दबाव आणण्यासाठी तरी जास्त होत्या. आजच्या आपल्या विजयाचा महत्त्वाचा खेळाडू सचिन किंवा इतर कुणी नसून कामरान अकमल होता. त्याने आज हातमोजे घातले होते म्हणून त्याला यष्टीरक्षक म्हणायचे अन्यथा तो बुंदी पाडायचा झाराच घेऊन आला होता... ...
आणखी वाचा
image

सगळ्यात मोठा सामना

30 March, 2011 11:28:00 AM आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने कधीही आपल्याला हरवलं नाही. हा आणि हाच फरक आपल्यात आणि त्यांच्यात आहे. आपल्याकडे अद्वितीय अशी आघाडीची जोडी आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो आपली फलंदाजी आतापर्यंत एकदाही ढासळली नाहीये. पाकिस्तानची दोनदा ढासळली आहे. ...
आणखी वाचा
image

ख-या पर्वाला सुरुवात!

29 March, 2011 11:57:00 AM न्यूझीलंडने लंकेला मारावे आणि आपण पाकिस्तानला म्हणजे अंतिम सामन्यात आपण न्यूझीलंडचा पराभव करून वर्ल्डकप जिंकू. पण जरा सावधान! जर उद्या न्यूझीलंडने श्रीलंकेला मारलं तर मग ते कुणालाही मारून वर्ल्डकपवर हक्क सांगू शकतात. पण हे कल्पनेचे खेळ झाले आणि सत्य हे कल्पनेपेक्षा जास्त अद्भुत असतं....
आणखी वाचा

ऑस्ट्रेलियाची डाळ शिजली नाही!

26 March, 2011 11:42:00 AM 1983 मध्ये आठ वर्ष अजिंक्य असलेल्या वेस्ट इंडिजला आपण अंतिम सामन्यात हरवलं. आता गुरुवारी फायनलच्या दोन फे-या आधी 12 वर्ष विजेते असलेल्या ऑस्ट्रेलियाला लोळवलं...
आणखी वाचा
image

ज्याचा दिवस तो जिंकणार!

24 March, 2011 12:11:00 PM मुनाफचा बॉल फलंदाजापर्यंत पोहोचत नाही. त्यांना आपली बोलिंग फटकावून खेळावी लागेल. तेव्हा त्यांना खेळवत ठेवलं पाहिजे. ते जेवढा वेळ खेळतील तेवढय़ा जास्त चुका करतील. त्यांना चुका करायला लावल्या पाहिजेत. शिवाय आपण तीन स्पिनर घेऊन खेळलं पाहिजे. त्यातल्या एका बोलरच्या दहा ओव्हर सरळ रेषेत संपवून टाकल्या पाहिजेत. कारण आपल्याकडे विश्वास ठेवावे असे केवळ दोन बोलर आहेत, एक झहीर खान आणि दुसरा हरभजन सिंग. इतर कुणावरही विश्वास ठेवता येण्यासारखा नाही. ...
आणखी वाचा
image

अखेर पोचलो!

22 March, 2011 09:30:00 AM चला! पहिल्या फेरीच्या शेवटाला आपण पोचलो. आपण म्हणजे वर्ल्डकप पहिल्या फेरीच्या शेवटाला पोचला. आयर्लंडने जरा खळबळ माजवली, पण शेवटी अपेक्षित आठ संघ बाद फेरीत पोचले....
आणखी वाचा
image

उपांत्य फेरीत कोण-कोण?

19 March, 2011 10:35:00 AM बांगलादेशने चमत्कार केला तरच उलथापालथ होईल आणि तसं झालं तर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हडबडून जातील. आपल्याला वेस्ट इंडीजने 160 धावांच्या फरकानं हरवलं आणि बांगलादेशने आफ्रिकेला हरवलं तरच इंग्लंड पुढे जाईल....
आणखी वाचा
image

‘पॉवर-प्ले’ ठरला घातक

14 March, 2011 11:01:00 AM खरं तर पॉवर-प्ले मध्ये जी अपेक्षा असते, तशी फलंदाजी आपण एरव्ही करत होतो. वेगळा ‘पॉवर-प्ले’ घ्यायची गरज होती का? घ्यायचा तर शेवटी घ्यायचा होता. घेतल्यावर लगेच सचिन बाद झाला. म्हणजे डाव अंगाशी आला होता. मग फलंदाजीचा क्रम बदलायची गरज होती का? जर विराट कोहली आला असता आणि त्याने गंभीरच्या साथीने एकेरी-दुहेरी धावा काढल्या असत्या, तरी आपण 325 चे उद्दिष्ट गाठले असते. आणि यायचंच तर स्वत: ढोणीने यायला हवं होतं. पुन्हा एकदा लिहितोय, ढोणी वर आला पाहिजे. ...
आणखी वाचा
image

आपण दक्षिण आफ्रिकेला मारणार!

12 March, 2011 11:32:00 AM हरभनजनने टिच्चून गोलंदाजी केली; पण त्याने तीन तरी बळी मिळवायला हवे होते. खरं तर या आधीही त्याने मिळवले असते तर चांगलं झालं असतं. चावलाने जुही चावलापेक्षा बरी गोलंदाजी केली. रविचंद्रन अश्विन कधी खेळणार? का एकदम त्याला दक्षिण आफ्रिकेसमोर उभा करणार? अजून एक! हरभजन नेहमीच पहिल्या पंधरा षटकात गोलंदाजी करायला नाखूश असतो. घाबरतो असं म्हणूया का? ...
आणखी वाचा
1 2 next total: 17 | displaying: 1 - 10