संजय मोने यांचा 'फ्री हिट'
ढोणीने तिस-या क्रमांकावर खेळावं!
09 March, 2011 11:16:00 AM
आर्यलडची कमाल मर्यादा इंग्लंडच्या विजयामुळे बहुधा संपली आणि आपण त्यांना 150 ते 175 धावांत गुंडाळून टाकायला हवं होतं. 30-40 धावा जास्तच करू दिल्या. पियुष चावला पुन्हा एकदा अपयशी ठरला, पण युवराजने पाच बळी घेतले यातच त्यांच्या फलंदाजीची मर्यादा कळली. पठाणने झेल सोडला नसता तर त्यांना 150 ही दिसले नसते.
आयर्लंडचे कौतुक
06 March, 2011 08:00:00 PM तर आयर्लंड-इंग्लंडचा सामना! 120च्या आत अर्धा संघ बाद झाला असताना त्यांनी 327 चा आकडा गाठला, हे कौतुकास्पद आहे...पुढचा रस्ता कठीण आहे
01 March, 2011 11:39:00 AM सरकारी कर्मचारी जसा दिवस ढकलत असतो तसे आपण सामना रेटत होतो. अचानक झहीरने तीन बळी घेतले आणि सामन्यात जान आली, असं वाटायला लागलं. पण जिंकण्यासाठी काही निकराचे प्रयत्न चालले आहेत, असं वाटलं नाही. शेवटच्या तीन षटकात सामना आपल्या बाजूने झुकला, असं वाटतं न वाटत तोच ब्रेस्नन आणि शाहजादने षटकार मारले. चावलाने आपल्या सहा चेंडूत इंग्लंडला सामना जिंकूनच दिला, असं वाटायला लागलं. शेवटी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला आणि बरोबरीत सुटला....दोन वर्ल्डकप का नकोत?
25 February, 2011 11:35:00 AM रणजी स्पर्धा जशी दोन स्तरावर खेळली जाते तशी ही विश्वचषक स्पर्धा खेळली जावी आणि तिचे दोन विजेते असावेत....वचपा काढला..!
21 February, 2011 09:00:00 AM चार वर्षापूर्वी 2007च्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशने आपल्याला बाद फेरीत हरवून वर्ल्डकपमधूनच बाद करून टाकले होते. सगळय़ांना तो पराभव जिव्हारी लागला होता....सेमीफायनल! ...लागली पैज?
19 February, 2011 12:10:00 PM एक बरं आहे, वर्ल्डकप भारतीय उपखंडात आहे म्हणजे पाकिस्तानात नाहीये, पण लंका, बांगलादेश आणि भारतात आहे. त्यामुळे फलंदाजांना दिवस बरे येणार....निकृष्ट आणि फडतूस
16 February, 2011 12:53:00 PM सर्वोत्कृष्ट संघ काढायची एक टूम निघते. आणि मग एक आत्ताचा, एक वीस वर्षापूर्वी खेळलेला, कोणी एक पस्तीस वर्षापूर्वी खेळलेला यांचा एक संघ निवडला जातो आणि जगातले अनेक नामवंत त्यावर खल करत बसतात हा मूर्खपणा आहे. सदाशिवराव पेशवे हे जर मोगलांचे सरदार असते तर पानिपताची लढाई आपण जिंकलो असतो, असा निष्कर्ष जर कोणी काढला तर तो जेवढा मूर्खपणा ठरेल तेवढाच हाही आहे. यातून मला एक सहज कल्पना सुचली, उत्कृष्ट संघ सगळेच काढतात आपण जर आपल्या भारताचा एक दिवसीय सामन्यातला सगळ्यात गचाळ संघ काढला तर? त्याचा फायदा असा आहे, की त्या संघाला कुणी प्रायोजक मिळणार नाही, म्हणजे जाहिरातींच्या दरम्यान जो सामना बघावा लागतो तसा बघावा लागणार नाही, हरल्याचं दु:ख नाही....मोस्ट कमेंटेड














































































































राशीभविष्य