ऑस्ट्रेलियाची जगज्जेतेपदाची हॅटट्रिक
2007 साली कॅरेबियन बेटांवर झालेली विश्वचषक स्पर्धा जिंकून ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदांची हॅटट्रिक साधली...
- विश्वचषक स्पर्धा 2007 साली प्रथमच कॅरेबियन बेटांवर झाली. पहिले दोन विश्वचषक जिंकणा-या वेस्ट इंडिजने या स्पर्धेचे यजमानपद भूषवले. 13 मार्च ते 28 एप्रिल या काळात ही स्पर्धा झाली.
- या स्पर्धेत 51 सामने झाले.
2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी संघांच्या संख्येचा विक्रमच झाला. एकूण 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेसाठी एकूण 97 देशांच्या प्रवेशिका आल्या होत्या.
सहभागी संघ
Ø ऑस्ट्रेलिया
Ø भारत
Ø इंग्लंड
Ø वेस्ट इंडिज
Ø पाकिस्तान
Ø न्यूझीलंड
Ø श्रीलंका
Ø दक्षिण आफ्रिका
Ø बांगलादेश
Ø झिम्बाब्वे
Ø केनया
Ø स्कॉटलंड
Ø हॉलंड
Ø आयर्लंड
Ø कॅनडा
Ø बर्म्युडा
- तब्बल 16 संघ सहभागी झाल्याने त्यांना चार गटांत विभागण्यात आले. प्रत्येक गटातील संघांमध्ये प्राथमिक फेरी झाली. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ सुपरएट फेरीत पोहोचले. प्राथमिक फेरी अनेक धक्कादायक निकालांनी गाजली. भारत आणि पाकिस्तानसारखे संघ प्राथमिक फेरीतच बाद झाले, तर बांगलादेश, आयर्लंडसारख्या तुलनेने दुबळ्या संघांनी सुपरएट फेरीत प्रवेश केला.
- ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि आयर्लंड या संघांनी सुपरएट फेरीत प्रवेश केला.
- सुपरएट फेरीतील कामगिरीच्या जोरावर पहिल्या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. श्रीलंका व न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये उपांत्य सामने झाले.
- 1996 विश्वचषक स्पर्धेनंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे दोन संघ अंतिम फेरीत आमनेसामने आले. यावेळी निकाल मात्र वेगळा लागला. श्रीलंकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जेतेपदांची हॅटट्रिक साधली.
2007 विश्वचषक स्पर्धेत भारत
v पहिल्या दोन विश्वचषक स्पर्धा सोडल्या तर भारताची ही विश्वचषकातील सर्वात खराब कामगिरी म्हणावी लागेल. भारत या स्पर्धेत पहिल्या आठ संघांमध्येही येऊ शकला नाही.
v प्राथमिक फेरीत सलामीलाच बांगलादेशसारख्या संघाने भारताचा पाच विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा 191 धावांत खुर्दा उडाला आणि बांगलादेशने हे सोपे आव्हान सहज पार केले. सुपरएट फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या संधी याच सामन्यानंतर धूसर झाल्या होत्या.
v दुस-या सामन्यात मात्र भारताने विजयासह धावसंख्येचा विक्रम साधला, अर्थात नवख्या बर्मुडा संघाविरुद्ध. भारताने 50 षटकांत 413 धावांचा डोंगर उभा केला. बर्मुडाचा संघ या आव्हानाचा पाठलाग करताना 156 धावांत बाद झाला.
v तिस-या सामन्यात श्रीलंकेने 69 धावांनी पराभव केल्यामुळे राहुल द्रविडच्या भारतीय संघाची विश्वचषक स्पर्धेतून गच्छंती निश्चित झाली.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा