पहिले पान | क्रीडाजगत | रन दणादण | भारतातील दिवस संस्मरणीय- गॅरी कर्स्टन

भारतातील दिवस संस्मरणीय- गॅरी कर्स्टन

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची तीन वर्षे आयुष्यातील संस्मरणीय असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी मंगळवारी व्यक्त केले.

मुंबई- भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची तीन वर्षे आयुष्यातील संस्मरणीय असल्याचे उद्गार भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक  गॅरी कर्स्टन यांनी मंगळवारी काढले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपण प्रशिक्षक पदाचा राजीनामा देत असल्याचे अधिकृतपणे सांगितले.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा गॅरी कर्स्टन यांच्याकडे तीन वर्षांपासून होती. वास्तविक त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा कोणताही पूर्वानुभव नसतानाही त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला दिलेल्या प्रशिक्षणाच्या जोरावर संघाने जगज्जेतेपद  मिळवले. अशा जगज्जेत्या संघाच्या प्रशिक्षकपदावर राहणे आपल्याला नक्कीच आवडले असते. मात्र काही वैयक्तिक जबाबदा-यांमुळे आपल्याला  या पदाचा राजीनामा द्यावा लागत आहे. भारतामध्ये मिळालेल्या प्रेम आणि आपुलकीमुळे भारत सोडताना खूप दुःख होत  असल्याचे कर्स्टन यांनी सांगितले.

प्रशिक्षकपदाचा कोणताही पूर्वानुभव नसताना ही जबाबदारी पेलणे हा माझ्यासाठी एक मोठे आव्हान होते पण ही जबाबदारी मी समर्थपणे पेलू शकलो. भारतीय संघातील खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला यामुळेच ते हा वर्ल्डकप जिंकू शकले. यात आपला हातभार लागला याबद्दल कर्स्टन यांनी समाधान व्यक्त केले.

पुढील काही दिवस आपण आपल्या कुटुंबियांसोबत घालवणार असल्याने सध्यातरी कोणत्याही संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारणार नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र काही दिवसांनंतर याबाबत आवर्जून विचार करू असेही त्यांनी नमूद केले.

क्रिकेट जगतामध्ये भारतीय संघ सर्वोत्तम असल्याचे मत गॅरी कर्स्टन यांनी यावेळी व्यक्त केले आहे. आताच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या कामगिरीमध्ये सातत्य दिसून आले आहे. हे सातत्य त्यांनी कायम राखावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भारतीय संघातील विराट कोहली, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, प्रग्यान ओझा, मुनाफ पटेल या युवा खेळाडूंचे कर्स्टन यांनी भरभरून कौतुक केले.  या वर्ल्डकपमध्ये मुनाफ पटेलने केलेल्या गोलंदाजीमुळे आपण प्रभावित झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. झहीर खान हा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असून तणावाच्या परिस्थितीमध्ये विचलित न होता त्याची गोलंदाजी उत्तम  होत असल्याचे गौरवोद्गार कर्स्टन यांनी यावेळी काढले. या वर्ल्डकपमध्ये मालिकावीर ठरेलला युवराज सिंगची ही कर्स्टन यांनी भरभरून प्रशंसा केली. युवराजचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगत तो  उत्तम फलंदाज तर आहेच पण लवकरच उत्तम गोलंदाजही ठरेल असा विश्वास कर्स्टन यांनी व्यक्त केला.

भारतीय संघातील  प्रत्येक खेळाडूने प्रशिक्षक म्हणून आपल्याला जे मोलाचे सहकार्य दिले त्याबद्दल आणि तमाम भारतीय नागरिकांचे कर्स्टन यांनी आभार मानले.

दक्षिण आफ्रिकेचे नगारिक असलेल्या कर्स्टन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची चोकर्स म्हणून जी संभावना केली जाते त्याबद्दल खंत व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू तसे नाहीत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0