विश्वविजेत्या क्रिकेटपटूंना नॉयडात बंगले
वर्ल्डकप जिंकणा-या भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव अद्याप चालूच असून राजधानीतील आम्रपाली बांधकाम कंपनीने संघातील सर्व क्रिकेटपटूंना बंगले देण्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली- वर्ल्डकप जिंकणा-या भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव अद्याप चालूच असून राजधानीतील आम्रपाली बांधकाम कंपनीने संघातील सर्व क्रिकेटपटूंना बंगले देण्याची घोषणा केली आहे. कर्णधार महेंद्रसिंग ढोणी 2009 सालापासून या कंपनीचा ब्रॅण्ड अंबॅसडर आहे.
नॉयडामधील आम्रपाली ड्रीम व्हॅली प्रॉजेक्ट या वसाहतीत क्रिकेटपटूंना बंगले दिले जाणार आहेत. कर्णधार ढोणीला एक कोटी रुपये किमतीचा, 2,900 चौरस फुटांचा बंगला दिला जाणार आहे, तर संघातील अन्य क्रिकेटपटूंना प्रत्येकी 55 लाख रुपये किमतीचे, 1,690 चौरस फुटांचे बंगले दिले जातील, असे कंपनीचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार शर्मा यांनी सांगितले.
या वसाहतीचे बांधकाम सध्या चालू असून येत्या तीन वर्षांत ते पूर्ण होईल, असे शर्मा यांनी सांगितले.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा