PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: असे आहेत विश्वचषक स्पर्धेतले संघ भारत ================================================================================ प्रहार on 04 February, 2011 11:35:00 PM बांगलादेशविरुद्धचा सामना आणि काही प्रमाणात वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना वगळल्यास भारताला प्रत्येक विजयासाठी झगडावे लागले होते. मात्र गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला उपांत्यपूर्व फेरीत धूळ चारून भारतीय संघाने हे अपयश धुऊन काढले आहे. ऑस्ट्रेलिया ================================================================================ प्रहार on 11 February, 2011 04:30:00 AM सर्वाधिक चार वेळा वर्ल्डकप जिंकलेला ऑस्ट्रेलियन संघ फेवरिट नसला, तरी त्यांची कामगिरी फार खराबही झालेली नाही. अजूनही ही स्पर्धा जिंकण्याची क्षमता ते बाळगून आहेत दक्षिण आफ्रिका ================================================================================ प्रहार on 14 February, 2011 12:45:00 PM जवळपास प्रत्येक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा संघ फेवरिट असतोच. यावेळी त्यांची उमेदवारी अधिक तगडी होती, कारण त्यांच्या गोलंदाजीत पूर्वी कधीही नव्हते इतके वैविध्य दिसून आले. श्रीलंका ================================================================================ प्रहार on 10 February, 2011 11:33:00 PM स्पर्धेचे एक सहयजमान या नात्याने श्रीलंका एक फेवरिट आहेत. पाकिस्तानविरुद्धचा पराभव सोडल्यास त्यांची गटातली आजवरची कामगिरी समाधानकारक झालेली दिसते. पाकिस्तान ================================================================================ प्रहार on 10 February, 2011 11:10:00 PM भारताप्रमाणेच पाकिस्ताननेही उपांत्य फेरीत प्रवेश करून गेल्या स्पर्धेतल्या नामुष्कीचे भूत गाडून टाकले. या पाकिस्तानी संघाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. पण याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर फारसा झालेला नाही. इंग्लंड ================================================================================ प्रहार on 10 February, 2011 11:38:00 PM दक्षिण आफ्रिका, भारताविरुद्ध कडवी लढत, तर आयर्लंड, बांगलादेशसारख्या दुबळ्या संघांकडून मार...वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात उत्कंठावर्धक सामने इंग्लंडचा संघच खेळला आहे.... वेस्ट इंडिज ================================================================================ प्रहार on 10 February, 2011 11:09:00 PM पहिले दोन वर्ल्डकप जिंकलेल्या वेस्ट इंडिजचे साम्राज्य 1980च्या दशकाच्या अखेरीस लयाला गेले. त्यामुळे गेल्या काही स्पर्धांमध्ये एखाद-दुसरा धक्कादायक निकाल नोंदवणारा संघ इतपतच त्यांची नोंद घेतली जाते. न्यूझीलंड ================================================================================ प्रहार on 10 February, 2011 09:05:00 PM न्यूझीलंडच्या संघाने आधीच्या वर्ल्डकप स्पर्धाप्रमाणेच याही स्पर्धेत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. झिम्बाब्वे ================================================================================ प्रहार on 10 February, 2011 10:25:00 PM कसोटी दर्जा असलेल्या झिम्बाब्वेकडून वर्ल्डकपमध्ये ब-याच अपेक्षा होत्या. मात्र अनुभवी क्रिकेटपटू आणि उत्तम नेतृत्वाचा अभाव यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला. बांगलादेश ================================================================================ प्रहार on 11 February, 2011 06:42:00 AM घरच्या मैदानांवर सर्व साखळी सामने होऊनही उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची संधी बांगलादेशने वाया घालवली. वर्ल्डकपपूर्वी फॉर्मात असलेला बांगलादेश संघ घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला.