पहिले पान | क्रीडाजगत | पाकिस्तानी क्रिकेटमध्ये कयामत

पाकिस्तानी क्रिकेटमध्ये कयामत

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर, पीसीबीने युनुस खान आणि मोहम्मद युसुफ यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली आहे.

कराची : पाकिस्तानी क्रिकेटमधील खळबळजनक शोएब अख्तर किंवा मोहंमद असिफ प्रकरणे पोलिस ठाण्यातील किरकोळ एफआयआर वाटावीत, अशा प्रकारचा धरणीकंप बुधवारी झाला. ऑस्ट्रेलियात नुकत्याच जाऊन आलेल्या संघाची अत्यंत खराब कामगिरी आणि एकूणच संघातील बेशिस्त-बेदिलीची गंभीर दखल घेऊन पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने मोहंमद युसुफ आणि मोहंमद युनुस या आजी-माजी कर्णधारांवर सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बंदी घातली. शाहीद आफ्रिदी आणि शोएब मलिक हे आजी-माजी टी-२० कर्णधार, गोलंदाज राणा नावेद उल हसन, यष्टिरक्षक कामरान अकमल आणि त्याचा धाकटा भाऊ उमर अकमल यांच्यावरही बंदी किंवा दंडाची कारवाई होईल. पण युसुफ आणि युनुससारखी ही बंदी कायमस्वरूपी नाही. शोएब मलिक, नावेद उल हसनवर एक वर्षाची बंदी आणि २० लाख (पाकिस्तानी) रुपयांचा दंड, तर शाहीद आफ्रिदी आणि अकमल बंधूंवर २० ते ३० लाख रुपये दंडाची कारवाई होईल. या तिघांनाही पुढील सहा महिने प्रोबेशनवर ठेवून त्यांचे वर्तन तपासण्याचा निर्णय पीसीबीने केला.

आपसांतील भांडणामुळे संघाची प्रतिमा खालावली, युवा क्रिकेटपटूंपुढे वाईट उदाहरण ठेवले, असे आरोप युनुस आणि युसुफ या सर्वात सिनियर फलंदाजांवर ठेवण्यात आलेत. ऑस्ट्रेलियात डिसेंबर-फेब्रुवारीत पाकिस्तानी संघ गेला. कसोटी मालिका ०-३, एकदिवसीय मालिका ०-५ आणि टी-२० मालिका ०-२ अशी गमावल्यानंतर या खराब कामगिरीचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानी बोर्डाने समिती स्थापली. या समितीच्या सर्व शिफारशी बोर्डाने स्वीकारल्या. एका सामन्यात भर मैदानात चेंडूचा चावा घेतल्याचा फटका आफ्रिदीला बसला. नावेद-शोएबला ढिसाळ कामगिरीची शिक्षा झाली. ऑस्ट्रेलिया मालिकेत खंडीभर झेल टाकल्याबद्दल यष्टिरक्षक कामरान अकमलला फटका बसला तर त्याला संघात ठेवण्यासाठी दौऱ्यावरील निवड समितीवर दडपण आणण्याचा केलेला आगाऊपणा युवा फलंदाज उमर अकमलला भोवला. सहसा मॅच फिक्सिंगबद्दल आजीवन बंदी घातली जाते. युसुफ-युनुसवरील बंदी आजीवन नाही, असा खुलासा पीसीबीने संध्याकाळी केला. कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या दोघांना पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. पण त्यांना डोमेस्टिक किंवा कौंटी क्रिकेट खेळता येईल, असे पीसीबीने स्पष्ट केले. गरज वाटल्यास त्यांना पुन्हा राष्ट्रीय संघातही घेऊ, अशी तळटीप या निवेदनात आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
4.00