पहिले पान | रविवार विशेष

रविवार विशेष

पुरुषी दृष्टिकोनालाच आव्हान!

08 January, 2012 11:50:00 AM
स्त्रियांची असुरक्षितता हा नेहमीच उद्वेगाने बोलला जाणारा विषय. शहरात, उपनगरात लोकल, बसमधील प्रवासाबरोबरच रस्त्याने येता-जाता (शाळा-कॉलेजेसमध्ये, कार्यालयातही) वयाच्या कुठल्याही टप्प्यात असलेल्या महिलांना अतिप्रसंगांना, विनयभंगाला सामोरे जावे लागते. बिहारलाही मागे टाकेल, अशा घटना मुंबईतही घडताना दिसतात. ‘पब्लिक प्रॉपर्टी’ समजून छेडछाड करणाऱ्याच्या कानफटात देण्याची डेअरिंग मुली का करत नाहीत, दुस-याच्या मदतीची अपेक्षा कुठवर नि कशासाठी करायची, स्त्री-पुरुषाच्या समानतेचे गोडवे आपण गातो. मग महिलांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी तरी परावलंबी का राहायचे. पुरुषी दृष्टिकोनालाच आव्हान द्यायला स्त्री आता तयार झाली आहे.

लोकलमधील सुरक्षाव्यवस्था वाढवावी

08 January, 2012 11:47:00 AM लाखो महिला कामानिमित्ताने दररोज लोकलचा वापर करतात. दिवसाचे काही तास लोकलमध्ये घालवणाऱ्या महिलांना रेल्वे प्रवास सुखकर व्हावा, असे वाटत असते. पण महिलांच्या डब्यात चढणारे इतर प्रवासी, भिकारी-गर्दुल्ले आणि फेरीवाल्यांचा त्रास कमी करण्यासाठी काहीच उपाययोजना होत नसल्याबद्दल महिला वर्ग आजही नाराज आहे. त्यासाठी लोकलमधील सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी महिलांकडून होत आहे....
आणखी वाचा

भीती पाठलाग करत राहते!

08 January, 2012 11:45:00 AM लोकल मुंबईची जीवनवाहिनी म्हणतात. पण ही जीवनवाहिनी महिलांसाठी दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालल्याचे काही घटनांवरून दिसून येते. महिलांसाठी रेल्वे सुरक्षित कधी बनेल, याची हमी सध्या कुणीच देऊ शकत नाही. रात्री-अपरात्री चाकू-सुरे घेऊन रेल्वे डब्यात घुसून महिला प्रवाशांच्या वस्तू व रोख रक्कम लुटली जाते. अनेकदा गर्दुल्ले महिलांच्या डब्यात ठाण मांडून बसलेले असतात. त्यांचा अवतार बघून त्यांना हुसकावून लावण्याची हिंमत डब्यातल्या एकटय़ा-दुकटय़ा महिलेला होत नाही. अशा वेळी त्या डब्यातून उतरून पुरुषांच्या डब्यात जाऊन बसण्याशिवाय पर्याय उरत नाही. ...
आणखी वाचा

महिलाच सॉफ्ट टार्गेट का?

08 January, 2012 11:42:00 AM स्त्री प्रतिकार करणार नाही किंवा केला तरी त्यात काही जोर असणार नाही, हे पुरुषांकडून गृहित धरले जाते. त्यात स्त्रीची शारीरिक रचना आणि क्षमताही पुरुषाच्या तुलनेने कमीच असते. शरीररचना आणि मानसिकता या दोन्ही बाबी गृहित धरल्या तर महिला या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पुरुषांसाठी सॉफ्ट टार्गेट असतात. त्यात लैंगिक स्वरूपाच्या गुन्ह्यातही महिलांनाच टार्गेट केले जाते. महिलांना सॉफ्ट टार्गेट बनवण्यात तिच्या कुटुंबासह समाजाचाही हातभार आहे. आजही भारतीय समाजात मुलींना लाजायला, मान खाली घालून एखादी गोष्ट निमूटपणे स्वीकारायला शिकवले जाते. मुलाने खोडकर असले तर चालते पण मुलीने खोडकर असू नये, असे मनावर ठसवले जाते. मुलीने नाकासमोर चालावे, सांगितलेल्या गोष्टी स्वीकारत दुधात साखर विरघळावी त्या सहजतेने गोष्टी स्वीकाराव्या. या बाबी म्हणजे कुटुंबाच्या आणि समाजाच्या आज्ञा, आदेश असतात. वरिष्ठाने आपल्या कनिष्ठाला दिलेल्या आज्ञा, आदेश पाळाव्यात अशी अपेक्षा असते. अगदी तशीच अपेक्षा स्त्रीकडून केली जाते आणि त्यात काही वावगे, चुकीचे केले जात आहे, असे कोणत्याही पुरुषाला वाटत नाही. स्त्री कुटुंबप्रमुख होत नाही, कुटुंबावर संस्कार करणारी, प्रतिकार करण्याची मानसिकता असलेली बनत नाही तोपर्यंत तरी कुटुंबाची आणि पर्यायाने समाजाची स्त्रीबाबतची तिला गृहित धरण्याची मानसिकता बदलणार नाही. स्त्रीची असुरक्षितताही कायम राहील....
आणखी वाचा

येवा, सिंधुदुर्ग आपलोच आसा

25 December, 2011 06:30:00 AM ही भूमी संत, महंतांची तेवढीच ती कलंदरांचीही आहे. जिल्ह्यात असे एकही गाव नाही जेथ कुठचीही जत्रा होत नाही. तेथे कोणताही धार्मिक उत्सव होत नाही....
आणखी वाचा

बेरोजगारीला आता रामराम

25 December, 2011 06:30:00 AM महाराष्ट्राचे उद्योग धोरण जर पाहिले तर असे लक्षात येईल की, राज्यात उद्योगांचा विभागनिहाय समतोल विचार अपेक्षित आहे. त्यानुसार उद्योगांचे हब निर्माण करणा-या औद्योगिक वसाहती विकसित झाल्या. त्यामुळे उद्योगांना सवलती आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. ...
आणखी वाचा

सुरक्षित आणि सुसंस्कृत

25 December, 2011 06:30:00 AM दोन वर्षापूर्वी रौप्यमहोत्सव साजरा केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने विकासाचा उंबरठा पार केला आहे. सिंधुदुर्गने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविधांगी क्षेत्रांत प्रगती साधली, ती या जिल्ह्याचे नेतृत्व उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे आल्यानंतर....
आणखी वाचा

सर्वागीण विकास हेच लक्ष्य

25 December, 2011 06:30:00 AM सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वागीण विकास व्हावा, या दृष्टीने जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांनी चौफेर विकासाची संकल्पना प्रत्यक्ष रूपात आणण्याचे शिवधनुष्य लीलया पेलले आहे....
आणखी वाचा
image

झोंबतो गारवा!

18 December, 2011 06:30:00 AM कडाक्याची थंडी पडलीय, गारवा झोंबायला सुरुवात झालीय. मुंबईला थंडी आताशा जाणवायला लागली असली तरी राज्याच्या ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीमुळे काही पिके गळून पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. पण रब्बी पिकांना आवश्यक वातावरण निर्माण झाले असल्याने काही भागांतील शेतकरी खुशीत आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, नांदेड या राज्यांतील विविध जिल्ह्यांतील थंडीचा हा आढावा.....
आणखी वाचा

‘मुडी’ थंडी

18 December, 2011 06:30:00 AM थंडी.. गुलाबी, अलवार बोचणारी, हुडहुडी भरवणारी, अंग आकसणारी.. थंडीची वेगवेगळी रूपं प्रत्येकालाच हवीहवीशी वाटतात. मुंबईसारख्या दमट शहरात तर सर्वाधिक प्रतीक्षा असते ती थंडीचीच....
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 395 | displaying: 1 - 10