PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: रविवार विशेष 15 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला ================================================================================ प्रहार on 20 May, 2012 02:05:00 PM प्रश्न आहे तो राज्यातील इतर 9 विद्यापीठांच्या निकालांचा. या विद्यापीठांतून सुमारे 15 लाख विद्यार्थी आहेत आणि तेथे अजूनही अध्र्यावर उत्तरपत्रिकांची तपासणी थांबलेली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे. प्रश्न सरकारच्याच जबाबदारीचा ================================================================================ बाळासाहेब साळवे on 20 May, 2012 01:20:00 PM महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या ‘एमफुक्टो’ या संघटनेने विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन तब्बल 52 दिवस चालले. या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाचा अपवाद वगळता राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन करणारी एमफुक्टो ही संघटना, राज्य सरकार आणि या वादाचा थेट परिणाम होणार होता, ते विद्यार्थी या तिन्ही घटकांचे म्हणणे काय आहे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.. बडगा उगारला तेव्हा कुठे संप मिटला ================================================================================ राजेश टोपे on 20 May, 2012 06:30:00 AM राज्यातील प्राध्यापकांचा 52 दिवस चाललेला संप अखेर मिटला. प्रश्नपत्रिका न तपासण्याचा निर्णय घेऊन प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनाच वेठीस धरले होते. सरकारने वेळोवेळी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊनही ‘आताच निर्णय घ्या,’ अशी भूमिका एमफुक्टोने घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे अखेर सरकारला कारवाईचा बडगा उगारावा लागला. तो उगारताच शुक्रवारी संप मागे घेण्यात आला. या संपाबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी ‘प्रहार’शी बोलताना सरकारची भूमिका स्पष्ट केली. पाणी साठवा ‘शिवकालीन’ योजनेत ================================================================================ प्रहार on 13 May, 2012 01:02:00 PM ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी भूजलाचा स्रोत हा मुख्य आधार आहे. ग्रामीण भागातील 86 टक्के योजना भूजलावर आधारित आहेत पण भूजलाच्या अतिउपशामुळे आणि भूजलाचे योग्य प्रमाणात पुन:र्भरण न झाल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडतात. त्यामुळे योजना निकामी ठरतात. अपडेट पाणीपुरवठ्याचे ================================================================================ प्रहार टीम on 13 May, 2012 12:23:00 PM सध्या राज्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. असे असताना मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई आदी ठिकाणी पाण्याची नक्की काय स्थिती आहे. या शहरांचे जलस्रोत कोणते, तिथे नक्की किती पाणी साठा आहे नि तो किती दिवस पुरणार, ही स्थिती जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न. तलावांचे शहर घेते विकतचे पाणी ================================================================================ विवेक कांबळे on 13 May, 2012 12:18:00 PM तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या ठाणे शहरातील नागरिकांना दररोज विकतचे पाणी प्यावे लागते. महापालिका स्थापन होऊन अठरा वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेल्यानंतरही स्वतंत्र धरण बांधता न आल्याने दरवर्षी 80 कोटी रुपये महापालिकेला पाणी खरेदीसाठी खर्च करावे लागतात. त्यातच गळती आणि चोरीचे प्रमाण 30 टक्के असल्याने पाण्याच्या असमान वाटपाच्या तक्रारी कायम येत असतात. बारवी धरणात पुरेसा पाणीसाठा ================================================================================ संतोष गायकवाड on 13 May, 2012 12:14:00 PM ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिका क्षेत्रांना पाणीपुरवठा करणा-या बारवी धरणात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेने 20 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा कमी आहे. पाण्याच्या नियोजनासाठी प्रशासनाकडून दोन टक्के पाणीकपात करण्यात आली. त्यामुळे 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात आहे. त्यामुळे सध्या तरी पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार नसल्याचे दिसून येत आहे. 'गर्जा' महाराष्ट्र नव्हे उद्योगराष्ट्र ================================================================================ कैलास रेडीज on 29 April, 2012 12:13:00 PM महाराष्ट्राच्या निर्मितीला येत्या मंगळवारी 52 वर्षे पूर्ण होत आहेत. या 52 वर्षामध्ये राज्याने विविध क्षेत्रात विकास घडवून आणला. राज्यातील औद्योगिक क्षेत्राची मोठी भरभराट झाली आहे. वाहन क्षेत्र, औषध निर्माण, जैव तंत्रज्ञान, रसायने, अन्नप्रक्रिया, कृषी, रत्ने आणि दागिने, माहिती तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग यासारख्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमध्ये राज्याने प्रगतीचा नवीन ठसा उमटवला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र उद्योगराष्ट्र म्हणून उदयाला येत आहे. एकीकडे प्रगतीचा आलेख उंचावत असतानाच, शिक्षण क्षेत्रातही प्रगतीची विविध कवाडे खुली होत असतानाच राज्याचा मूळ पाया म्हणजेच मराठी भाषा हिची मात्र पीछेहाट होत आहे. पीछेहाट दिसून येतेय ती शाळांच्या माध्यमातून. प्रगती आणि कुठेतरी झालेली पीछेहाट याबाबत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मांडलेला लेखाजोखा.. याचसाठी केला होता अट्टहास? ================================================================================ अरुण ठाकूर on 29 April, 2012 12:28:00 PM स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व स्वीकारले व काही चुका करत ते अमलातही आणले. यानंतर लोकभाषांना ऊर्जितावस्था येईल, असे स्वाभाविकपणेच सर्वाना वाटत होते. शांघायची कसली ‘घाय’? ================================================================================ प्रहार on 22 April, 2012 11:29:00 AM मुंबईचे शांघाय होणार म्हणून स्वप्ने पाहिली जातात. पण या महानगरीला आणि तिच्यामध्ये वास्तव्य करणा-या लाखो नागरिकांना हालात लोटण्यासाठी एखादी घटनाही पुरेशी पडते.