रविवार विशेष
खड्डय़ांना निविदा प्रक्रियाच जबाबदार!
18 September, 2011 11:25:00 AM
रस्त्यांवरील खड्डे हा मुंबईला असलेला शाप आहे, असं जर कुणी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. या खड्डय़ांना कंत्राटदार जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच महापालिकेतील सत्ताधारी आणि अधिकारी जबाबदार आहेत. आपण फक्त रस्त्यांचे बांधकाम करणा-या कंत्राटदारांच्या विरोधात बोलत असतो.
युतीचे विसर्जनही खड्डय़ांतच!
18 September, 2011 11:20:00 AM महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणराय यांचे आगमन आणि गमनही अखेर मोठमोठय़ा खड्डय़ांतूनच झाल्याने बाप्पाही फार नाराज झाले असावेत. आपण रस्त्यावरून जातोय की खड्डय़ातून हेच बाप्पांना समजत नव्हते, खड्डे एवढे होते की, त्यांनीही सर्वसामान्यांप्रमाणेच खड्डय़ांतून रस्ता शोधण्याचा प्रयत्न सोडून दिला असणार. आराध्यदैवतासह सर्वानाच खड्डय़ात ढकलणा-या पालिकेतील सत्ताधारी युतीला आता जनताच खड्डय़ात लोटणार आहे. नाराज होऊन गेलेले बाप्पा पुढच्या वर्षी लवकर नाही, उशिराच येणार आहेत. पण तत्पूर्वी फेब्रुवारीतील महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे विसर्जन अटळ आहे!.....तर काकोडकर अहवालाची आवश्यकता भासणार नाही
04 September, 2011 11:10:00 AM राज्य सरकारने आवश्यक निधी विद्यापीठाला सढळ हस्ते पुरवला तर विद्यापीठांच्या सक्षमीकरणासाठी काकोडकरांच्या अहवालाचीही आवश्यकता भासणार नाही. परदेशात प्रत्येक विद्यापीठाच्या विभागात शंभर-शंभर प्राध्यापक, तज्ज्ञांची टीम काम करत असते. त्या तुलनेत आपल्याकडे केवळ बोटावर मोजण्याइतकीच दोन किंवा तीन माणसंच विभागामागे दिसतात. अभ्यासक्रमांवर ही दोन डोकी काय चर्चा करणार व कसले संशोधन करणार? ...दुर्बल घटकांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी
04 September, 2011 11:10:00 AM काकोडकर समितीच्या अहवालात ज्या शिफारशी करण्यात आल्या आहेत, त्याचे दोन भागांत वर्गीकरण करता येईल, एक ‘शॉर्ट टर्म’ व दुसरे ‘लाँग टर्म’. शॉर्ट टर्ममध्ये (अल्प कालावधीत) पूर्ण करता येण्यासारख्या शिफारशी म्हणजेच विद्यापीठाचे सक्षमीकरण आणि प्रोव्होस्ट, डीन पदांच्या नेमणुका. ...उच्चशिक्षण नव्या दिशेने..
04 September, 2011 11:00:00 AM राज्यातील उच्चशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने ‘हायर एज्युकेशन इन महाराष्ट्र, प्रिपेअरिंग फॉर फ्युचर-न्यू आयडियाज् अँड पाथवेज्’ हा अहवाल नुकताच राज्य सरकारकडे सादर केला. या शिफारशींच्या अमलबजावणीबरोबरच उच्चशिक्षणातील राजकीय हस्तक्षेप टाळणे, राज्य सरकारने आवश्यक निधी विद्यापीठाला सढळ हस्ते पुरवणे, सर्वच अभ्यासक्रम शिक्षण शुल्क समितीच्या नियंत्रणाखाली आणणे अशा अनेक गोष्टींची अमलबजावणीही आवश्यक असल्याचे अनेक शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. त्याचाच घेतलेला हा लेखाजोखा.....बहुआयामी चळवळ
28 August, 2011 12:15:00 PM इतिहासकाळापासून अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय लढय़ांचा आणि विधायक चळवळींचा जन्म पुणे शहरात झाला. या लढय़ांना आणि चळवळींना राष्ट्रव्यापी नेतृत्वही पुण्यानेच दिले. पुण्यनगरीचे वैभव असलेली आणि शहराच्या राज्याच्याच नव्हे तर देशाच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार पोहोचलेली अशीच एक चळवळ म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाची चळवळ. धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय अशी बहुआयामी अशी ही पुण्याची चळवळ, देशालाच नव्हे तर जगाला एक अनमोल देणगी आहे. ...सार्वजनिक गणेशोत्सव काल, आज आणि उद्या
28 August, 2011 12:10:00 PM रत्नागिरीतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव 1910 साली विठ्ठल मंदिरात सुरू झाला. 1928 साली टिळक आळीतील पारावर लोकमान्य सेवा संघाने व 1929 साली पतितपावन मंदिर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने तिसरा उत्सव सुरू झाला. संपूर्ण जिल्ह्यातील सार्वजनिक उत्सवांची संख्या आज हजारांच्या घरात आहे....आले गणराय!
28 August, 2011 12:00:00 PM दरवर्षी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत असतो ते गणराय या आठवडय़ात घराघरांत आणि सार्वजनिक उत्सवांच्या मंडपात विराजमान होत आहेत. महाराष्ट्रातील उत्सवांचा मुकुटमणी अशी ओळख असलेला हा उत्सव कोकणात खऱ्या अर्थाने सर्व उत्सवांचा राजा आहे. गणपतीची तयारी, त्याची लगबग, गणपतीच्या पुढय़ातली आरास, भजने हे सर्वच कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचे विषय. तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेचे मूळ असलेल्या पुण्यातही या उत्सवाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गणपतीबाप्पांच्या आगमनानंतर पुढले अकरा दिवस आता फक्त आणि फक्त गणरायाच्या जयघोषाचे सूर निनादणार आहेत....उपाय कमी अपाय जास्त!
14 August, 2011 11:45:00 AM वर्षभरानंतर पुन्हा एकदा तेलगळतीचा अध्याय एम. व्ही. रॅकच्या निमित्तानं सुरू झाला आणि पुन्हा एकदा सागरी जैवविविधतेला पोहोचणाऱ्या हानीमुळे तेलगळती रोखण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची चर्चा झडू लागली. गेल्यावर्षीही चित्रातून झालेल्या गळतीमुळे हीच चर्चा महिना उलटल्यानंतरही सुरू होतीच. ...तकलादू कायदे, निष्क्रिय यंत्रणा
14 August, 2011 11:30:00 AM जहाज, बोटींतून होणारी तेलगळती आणि त्याचा सागरी पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम या नित्याच्याच घटना आहेत. परंतु, अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी कायदे करण्याची आवश्यकता आहे....मोस्ट कमेंटेड
















































































































राशीभविष्य