पहिले पान | हार आणि प्रहार

हार आणि प्रहार

शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचे उसने अवसान

11 October, 2008 01:00:00 AM
एकंदरीत कालचे उद्धव ठाकरे यांचे भाषण दिशाहीन, विस्कळीत आणि कोणत्याही ठोस मुद्दय़ाला स्पर्श न करणारं असं होतं. साहेबांना त्यांच्या अशा स्थितीत सभेला आणून उद्धव यांनी स्वत:ची किंमत कमी करून घेतली आहे. मला आठवतं, 2004 च्या निवडणुकांच्या वेळी साहेबांना राज्यात प्रचारदौरा करायचा होता. त्यावेळी साहेबांचा दौरा होऊ नये, असा प्रयत्न करणारे उद्धव ठाकरे आज स्वत:च्या स्वार्थासाठी मात्र साहेबांना हालअपेष्टा देत आहेत, हे पाहून सर्वसामान्य शिवसैनिकाचा जीव तीळ तीळ तुटत होता. तिकिटांची आमिषे दाखवून गर्दी जमा करण्याचा आणि असंबद्ध हातवारे करून जोश आणण्याचा प्रयत्न केला, तरी कालचे उद्धव यांचे भाषण म्हणजे `उसने अवसान'च होते.

हा `प्रहार' आपल्यासाठीच!

09 October, 2008 02:30:00 AM देशाला स्वातंत्र्य मिळवून देणा-या नेत्यांमध्ये त्याग होता. नि:स्वार्थीपणा होता आणि सामाजिक बांधीलकी होती. या गुणांचा अभाव असल्यामुळे राजकीय क्षेत्राबरोबरच पत्रकारितेच्या क्षेत्रात पदार्पण करून महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनामध्ये आपण काही परिवर्तन करू शकू, या भावनेतून मी या क्षेत्रात आलो आहे. माझ्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाचा नागरिक असेल. त्या माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी `प्रहार' विकासाच्या विचारांचे प्रबोधन करील आणि अन्यायाविरुद्ध प्रहारही करील. पत्रकारिता हा एक प्रामाणिक पेशा आहे, हे मला ज्ञात आहे आणि म्हणूनच `प्रहार' हे वृत्तपत्र `विकले' जाणार नाही; तर विकासासाठी, उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी धारदार शब्दांनी प्रहार करीत राहील. ...
आणखी वाचा
back 1 2 3 total: 22 | displaying: 21 - 22
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड