PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: केंद्रीय अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये ================================================================================ प्रहार on 26 February, 2010 04:10:00 PM * जागतिक मंदीचे सावट असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेने उत्तम कामगिरी केल्याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले. * जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर उद्योग जगताला दिलेले अर्थसहाय्य गुंडाळण्याच्या दृष्टीने आढावा घेण्याची गरज * सार्वजनिक खर्चाचा आढावा घेण्याची आवश्यकता * दुष्काळी परिस्थितीमुळे अन्नधान्य महागाई दरात वाढ * महागाई रोखण्यासाठी उपाययोजना चालू * मागील आठ वर्षांचा विचार करता अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली असल्याचा दावा * सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात जीडीपीचा विकासदर नऊ टक्क्यांपर्यंत नेणे हे पहिले उद्दिष्ट * अधिक सर्वसमावेशक आणि ठोस लाभ हे दुसरे उद्दिष्ट * गेल्या काही महिन्यात अर्थव्यवस्थेची कामगिरी लक्षणीय * 2009 सालच्या पहिल्या तिमाहीतच अर्थव्यवस्थेने स्थैर्य परत मिळवले. * डिसेंबर महिन्यात नोंदवला गेलेला 18.5% उत्पादन दर हा गेल्या दोन दशकातील सर्वोच्च * येत्या काही महिन्यात अधिक वेगवान विकास अपेक्षित * जानेवारी महिन्यातील निर्यातीची आकडेवारी उत्साह वाढवणारी * अन्न सुरक्षेचे बळकटीकरण * आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला सेवा पुरवण्यावर सरकारचा भर * प्रत्यक्ष करसंहिता एप्रिल 2011पासून अमलात येणे अपेक्षित * सार्वजनिक कराबाबत सद्यस्थितीचा अहवाल येत्या सहा महिन्यात * सामान्य विक्रीकराची अमलबजावणी एप्रिल 2011पासून अपेक्षित * सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधून निर्गुंतवणूक करून सरकार 25,000 कोटी रुपये उभारणार * इंधन दर विनियंत्रणाच्या प्रस्तावावर लवकरच निर्णय * पोषणमूल्यांवर आधारित खतांना एक एप्रिल 2010पासून सबसिडी * थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ स्थिर; ओघ वाढवण्यासाठी नियम सुलभ करणार * आर्थिक स्थैर्य आणि विकास समितीची स्थापना * खासगी पतसंस्थांना बॅकिंग परवाने देण्याचा प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विचाराधीन * हस्तकला उत्पादने निर्यात करणा-या उद्योगांना कर्जांवरील व्याजदरांत आणखी एक वर्षे दोन टक्के सबसिडी * विशेष आर्थिक क्षेत्रांच्या विकासासाठी पर्यावरण सुरक्षित कृषी प्रकल्पांकरता दोनशे कोटी रुपयांची तरतूद * रिटेल क्षेत्र खुले करण्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज * कृषिकर्जांच्या परतफेडीसाठी 30 जून, 2010 पर्यंत मुदतवाढ * पीक कर्जाची परतफेड वेळवर करणा-या शेतक-यांना व्याजदरात दोन टक्के सबसिडी * पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1,73,552 कोटी रुपयांची तरतूद * रेल्वेसाठी 16,752 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद * कोळसा विकास नियामक प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव * वीजनिर्मितीचा खर्च कमी करण्यासाठी महावीज प्रकल्पांच्या धोरणात बदल * ऊर्जा क्षेत्रासाठीच्या तरतुद दुपटीने वाढवून 5,130 कोटी रुपये * लडाख भागात सौरऊर्जा तसेच जलविद्युत प्रकल्पांसाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद * ऊर्जानिर्मितीचे नवनवीन स्रोत शोधून काढण्यासाठी क्लीन एनर्जी फंड * अपारंपरिक ऊर्जा खात्यासाठीची तरतूद 61 टक्क्यांनी वाढवून 1000 कोटी रुपये * तामिळनाडुतील तिरूपूर वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी दोनशे कोटींचे अर्थसहाय्य * गंगा खोरे प्राधिकरणासाठीची तरतूद दुपटीने वाढवून पाचशे कोटी रुपये * पश्चिम बंगालमधील सागर बेटावर पर्यायी बंदराचा विकास * अन्नसुरक्षा विधेयकाचा मसुदा तयार असून लवकरच जनतेसाठी खुला करणार * सामाजिक क्षेत्रासाठी 1,37,674 कोटी रुपयांची तरतूद, ही तरतूद एकंदर नियोजित तरतुदीच्या 37 टक्के * शालेय शिक्षणासाठी 31,036 कोटी रुपयांची तरतूद * आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यासाठी 22,300 कोटी रुपयांची तरतूद * ग्रामविकास खात्यासाठी 66,100 कोटी रुपयांची तरतूद * इंदिरा आवास योजनेत प्रतिघरटी तरतुदीत वाढ, सखल भागांसाठी 45,000 रुपये, तर डोंगराळ भागांसाठी 48,500 * नगरविकास खात्यासाठीची तरतूद 75 टक्क्यांनी वाढवून 5,400 कोटी रुपये * 20 लाखांपर्यंतच्या घरांसाठी घेतलेल्या दहा लाखांपर्यंतच्या गृहकर्जांवरील व्याजदरात एक टक्का सबसिडी * अतिलघू आणि लघुउद्योगांसाठी 2,400 कोटी रुपयांची तरतूद * झोपडपट्टी विकास कार्यक्रमासाठी 1,270 कोटी रुपयांची तरतूद * असंघटित क्षेत्रातील मजुरांकरता राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा निधीसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद * महिला आणि बालकल्याण खात्यासाठीच्या तरतुदीत 80 टक्क्यांनी वाढ * अल्पसंख्याक व्यवहार खात्यासाठी 2,600 कोटी रुपयांची तरतूद * विशेष ओळखपत्र प्राधिकरणासाठी 1,900 कोटी रुपयांची तरतूद