PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: वाचकांच्या कॅमे-यातून वाचकांच्या कॅमे-यातून ================================================================================ संदेश हडकर on 10 September, 2010 06:15:00 AM पावसाळ्यात घाटातील वातावरण पाहण्यासारखं असतं. घाटात आधीच अंधार असतो, त्यात पावसाळी वातावरणाचं धुकं दाटल्यामुळे अंधारमिश्रीत गडद अंधार निर्माण होऊन समोरचं काही अंतरावरील दिवसाही दिसेनासं होतं. गाडीच्या हेडलाइट्सच्या प्रकाशामुळे समोरचं दिसतं म्हणून वाहन चालवणं जमतं पण तेही सावकाश. माळशेज घाटातील हाच अनुभव कॅमे-यात टिपलाय संदेश हडकर यांनी.