पहिले पान | जनरल | बढतीअभावी नोकरदारांमध्ये वाढती निराशा

बढतीअभावी नोकरदारांमध्ये वाढती निराशा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

जवळपास 59 टक्के भारतीय व्यावसायिक यंदाच्या वर्षात आपल्या नोकरीला ‘राम राम’ करण्याची शक्यता असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.

मुंबई- नोकरीमध्ये कंपनीला अपेक्षित असलेली चांगली कामगिरी करून दाखवल्यावर त्याची पोचपावती म्हणून बढती मिळावी अशी अपेक्षा प्रत्येक व्यावसायिकालाच असते. परंतु अव्वल व्यवस्थापनाकडून अशा प्रकारची कोणतीच पोचपावती मिळत नसल्याने जवळपास 59 टक्के भारतीय व्यावसायिक यंदाच्या वर्षात आपल्या नोकरीला राम रामकरण्याची शक्यता असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. अव्वल व्यवस्थापनाकडून कर्मचा-यांबरोबर असलेला संपर्काचा अभाव आणि सहभाग हे नोकरी सोडण्याचे सर्वात मुख्य कारण असल्याचे मत 50 टक्क्यांनी व्यक्त केले असून 30 टक्के जणांनी व्यवस्थापनाकडून दूरदृष्टीच्या अभावामुळे नोकरी सोडण्याचा विचार करीत असल्याचे रिगसने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. बढती न मिळाल्यामुळे जर भारतीय व्यावसायिकांनी विद्यमान नोकरीला सोडचिठ्ठी दिली तर साधारणपणे उन्हाळ्याच्या सुटीनंतर नव्या नोकरीचा शोध घेणा-यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त केली आहे. नावीन्यपूर्ण नोक-यांची संधी पुरवण्यामध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या रिगसने फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून 15 हजारापेक्षा जास्त व्यावसायिकांच्या मुलाखती घेतल्या. या सर्वेक्षणाचे व्यवस्थापन आणि प्रशासन मार्केटिंग युकेया एका स्वतंत्र संस्थेमार्फत करण्यात आले होते. 

बहुसंख्य कर्मचा-यांनी नोकरी सोडण्यास सुरुवात केली असून ते नव्या संधींचा शोध घेत आहेत. हा आर्थिक सुधारणा आकाराला येत असल्याचा एक परिणाम असल्याचे या अहवालावरून दिसते, असे रिगसचे भारतातील प्रमुख मधुसूदन ठाकूर यांनी सांगितले.

 कंपन्यांमधील प्रतिभावंत व्यावसायिकांची होणारी गळती रोखण्यासाठी कंपनीने काय करायला पाहिजे, असाही प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. यावर पगारवाढीबरोबरच कामकाजाच्या वेळेतील लवचीकता याला 42 टक्के व्यावसायिकांनी प्राधान्य दिले आहे. कार्यालय परिसरातील नीटनेटकेपणाच्या अभावाबरोबर आपण केलेल्या कामाचे श्रेय लाटणा-या बॉसमुळेही नोकरी सोडण्याची मानसिकता व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. प्रशासकीय मदतीचा अभाव (20 टक्के) आणि खासगी वैद्यकीय विमा (32 टक्के) यालाही व्यावसायिकांनी सर्वेक्षणात महत्त्व दिले आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0