सेनेला निवडणुकीत फटका बसणार

पालघर (प्रतिनिधी) : वसई येथे एका हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मराठी पाट्या लावण्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा फटका बसेल, असे भाकीतही त्यांनी केले.

माध्यमाशी बोलताना सेनेने राज्यात व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानावर मराठी भाषेच्या पाट्या लावण्याच्या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडले. मराठी पाट्यांसोबत हिंदी व इंग्लिश भाषांतील पाट्याही लागल्या पाहिजेत. शिवसेना जर केवळ मराठी पाटीचा आग्रह धरत असेल तर त्यांना येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलला होता, त्यावर शिवसेनेने कुरघोडी केली, असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आठवले यांनी हा मुद्दा राज ठाकरे यांचाच आहे, पण सेनेने तो आपल्या हाती घेतला आणि त्याबाबतचा आता त्यांनी कायदा केला. पण रिपाइंचा त्यास विरोध आहे. आगामी निवडणूक भाजप व आम्ही एकत्र लढवणार असून या निवडणुकीत सेनेचा पराभव अटळ आहे, असे त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर