भाजपाच्या रोजगार मेळाव्यातून बेरोजगारांना रोजगार

कल्याण : भारतीय जनता पार्टीचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि नगरसेविका कविता म्हात्रे यांच्यावतीने डोंबिवलीतील मॉंडल इंग्लिश स्कूल कुंभारखाण पाडा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात ६० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला होता. याद्वारे मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.


कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. आता कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर सर्व जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र बेरोजगार झालेल्या अनेकांना आपल्या नोकरीचा प्रश्न भेडसावत होता. अशा बेरोजगारांसाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती आयोजक विकास म्हात्रे यांनी दिली.



यावेळी फार्मास्युटिकल, हेल्थकेअर, पेट्रोकेमिकल, केमिकल, बँक, आयटी, मॅन्युफॅक्चरिंग, कन्सल्टंट, हाउसकीपिंग, सिक्युरिटी, कॉर्पोरेट इत्यादी विविध क्षेत्रातील ६० कंपन्या आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे शिक्षण, कला आणि अनुभवाच्या आधारे त्यांना नोकरी दिली. मुलाखती घेतल्यानंतर जागेवरच नियुक्ती लेटर देण्यात आले, त्यामुळे डोंबिवलीतील शेकडो सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली.

Comments
Add Comment

Disha Salian Case : CBI ची 'लेडी सिंघम' उकलणार दिशा सालियन मृत्यूचे गूढ; सीमा पाहुजांवर मोठी जबाबदारी!

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian Murder Case) यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास

Ganpati Visarjan : मुंबईत दीड दिवसांच्या 61,528 गणपतींचे विसर्जन; भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दीड दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाला मोठा प्रतिसाद मिळाला. 16 सप्टेंबर

 Cafe Mondegar : अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन; कुलाब्यातील प्रसिद्ध कॅफे मोंडेगारचा परवाना निलंबित

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या

Ganeshotsav 2026 : ‘पुढच्या वर्षी लवकर या!’; मुंबईत 25 हजारांहून अधिक दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दीड दिवसांच्या गणपती मूर्तींचे विसर्जन मंगळवारी (15 सप्टेंबर) मोठ्या

Mumbai Municipal Corporation : कंत्राट कामांंचे पैसे रोखले, १३ कोटींच्या तुलनेत ६६ कोटी रुपये देण्याची आली वेळ

खाते गोठवण्याचा न्यायालयाच्या भीतीने प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने केला मंजूर महापालिकेच्या मलनि:सारण

BMC : मुंबईत अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी ७६ वाहने तैनात

फेरीवाल्यांसह अतिक्रमण मुक्त पदपथ मोहिमेला आणि अधिक बळकटी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने