‘रन फॉर लेप्रसी’ मॅरेथॉन संपन्न

ठाणे(प्रतिनिधी) : सहाय्यक संचालक, आरोग्यसेवा(कुष्ठरोग), ठाणे सेवा(कुष्ठरोग), ठाणे व आरोग्य विभाग महानगरपालिका भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने "रन फॉर लेप्रसी" मॅरेथॉनचे सोमवार, दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनला सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ़ बुशरा सय्यद मॅडम व डॉ़ भागवत दहिफळे वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग ठाणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.


सदर मॅरेथॉनचा शिवाजी चौक, वंजारपट्टी नाका, एसटी स्टँड, हसिना टॉकीज मार्गे महानगरपालिका इमारत येथे समारोप करण्यात आला. महानगरपालिका सभागृह येथे दीप प्रज्वलन करून व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर बक्षीस वितरण उपआयुक्त दीपक पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व विजेत्यांना मेडल, पारितोषिक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त प्रणाली घोंगे यांचे मार्गदर्शन लाभले. महानगरपालिका माध्यमिक शिक्षण अधिकारी मोमीन निहाला, महानगरपालिका क्रीडा अधिकारी शरद कलावंत, जिल्हा पर्यवेक्षक(कुष्ठरोग), महेश निकुभ व कुष्ठरोग विभाग कर्मचारी विठ्ठल शेळकंदे, दत्तू चव्हाण, किसन ढेरे, रविनाथ जावळे(वैद्यकीय सहाय्यक), शहर क्षयरोग कर्मचारी व शिक्षकवर्ग उपस्थित होते. यावेळी शहरातील नागरिकांचा या ‘रन फॉर लेप्रसी’ला चांगला प्रतिसाद लाभला.

Comments
Add Comment

Dombivali Local Train : डोंबिवलीहून सुटलेल्या गर्दीच्या लोकल ट्रेनमधून महिला थेट ट्रॅकवर पडली अन्...व्हिडिओ व्हायरल

ठाणे : डोंबिवली स्थानकातून (Dombivali Railway Station) सकाळी ७:५६ वाजता सुटलेल्या तुफान गर्दीच्या लोकल ट्रेनमधून एक महिला प्रवासी

गणेशोत्सव २०२६ : गणेश विसर्जनाच्या दिवशी ठाण्यात अवजड वाहनांना बंदी; वाहतूक पोलिसांकडून नियमावली जाहीर

गणेशोत्सव २०२६ दरम्यान विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडाव्यात आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळावी, यासाठी ठाणे

Thane Metro Train Trial Run: ठाणेकरांसाठी गुड न्यूज! मेट्रोची ट्रायल रन यशस्वी; पहिला टप्पा केव्हापासून सुरू होणार?

ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. ठाणे शहरातील पहिल्या मेट्रो सेवेचा दुसऱ्यांदा ट्रायल रन घेण्यात

Mumbai Local Train Update : टिटवाळ्यात १५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक; लोकलसह मेल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम

मुंबई : १५ डब्यांच्या लोकल गाड्या सामावून घेण्यासाठी टिटवाळा स्थानकातील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचे काम

Brain Tumour Survivor : ब्रेन ट्यूमरवर मात, आता डॉक्टर होण्याचं स्वप्न! ठाण्याच्या तरुणाची दशकभराची झुंज अखेर केईएम पर्यंत

ठाणे : आजारपण, उपचार आणि अनेक अडचणींवर मात करत एखादं स्वप्न पूर्ण करणं सोपं नसतं. मात्र ठाण्यातील एका ब्रेन ट्यूमर

Kalyan News: "दुकानासमोर शिवी का देतो ?" जाब विचारल्यामुळे महिलेला मारहाण, कल्याण पूर्वेतील घटना; मारहाणीचा सीसीटीव्ही समोर

कल्याण: कल्याण पूर्वेतील (Kalyan News) नेतिवली परिसरामध्ये पुन्हा एकदा फ्री स्टाईल हाणामारीचा प्रकार घडलेला आहे. या