नाशिकमध्ये विशेष आकर्षण ठरतोय शिवाजी महारांजाचा ६१ फुट उंच पुतळा

नाशिक: नाशिक शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. याचे विशेष कारण शिवाजी महाराजांची ६१ फूट मुर्ती आणि २१ फूट लांब कवड्यांची माळ आहे. त्यासोबतच चौकाचौकांमध्ये उभारण्यात आलेले भव्य स्टेज, शिवचरित्रावर आधारित देखावे, सामाजिक सांस्कृतिक उपक्रम, त्याचबरोबर पोवाडे, शिवगितांचे गायन आधी कार्यक्रमांमुळे नाशिकचे वातावरण भगवे झाले आहे.


शिवाजी महाराजांचा हा भव्यदिव्य पुतळा अशोकस्तंभ मित्रमंडळाने उभारला आहे. या पुतळ्याची रूंदी २२ फुट तर वजन तब्बल ३ हजार किलो आहे. हा पुतळा बनवण्यासाठी १२ दिवसांचा कालावधी लागला आहे. अशोकस्तंभ येथे पुतळा ३ मोठ्या क्रेनच्या मदतीने दोन भागात हा पुतळा उभारण्यात आला. दीड महिन्यांपूर्वी पुतळा बनवण्यास त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील एच. पी. ब्रदर्स आर्टसच्या हितेश आणि हेमंत पाटोळे यांनी सुरुवात केली होती. मात्र पुतळ्याचे थोडेच रंगकाम बाकी असताना शॉर्टसर्किंटमुळे लागलेल्या आगीत पुतळ्याची हानी झाली. त्यानंतर बारा दिवसात पुन्हा नवीन पुतळा बनवण्यात आला.


तसेच महाराजांच्या गळ्यात २१ फूट लांबीची, ७१‎ किलो वजनाची, ६४ कवड्यांची माळ नाशिकरांचे लक्ष वेधुन घेत आहे. या उपक्रमाची वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. हा भव्य पुतळा आणि कवड्यांची माळ पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Navi Mumbai Airport: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास होणार अधिक स्वस्त; नेमकं कारण काय?

नवी मुंबई: विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. डिसेंबर २०२५ पासून सुरू

Navi Mumbai Ganeshotsav 2026: नवी मुंबई महापालिकेकडून शहरांत कृत्रिम तलावांची निर्मिती, तुमच्या परिसरात कुठेय?

नवी मुंबई: नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन वारंवार शासनाकडून केले जात आहेत.

Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सव आणि हरतालिका तृतीया एकाच दिवशी! 'हा' आहे पूजेचा योग्य शुभ मुहूर्त, वाचा सविस्तर

गणपती बाप्पाचे आगमन आले आले हो आले... गणपती बाप्पा आले! यंदा 14 सप्टेंबर 2026 पासून गणरायाच्या नामाचा गजर आणि जयघोष

Nashik : ‘Gen Z’ नव्हे, ‘Green Generation’ बना , गिरीश महाजन यांचे आवाहन ; मिशन ग्रीन मॉन्सून द्वारे साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Nashik : आजचा काळ ‘Gen Z’ युवकांचा आहे. त्यांच्या हातात मोबाईल, इंटरनेट आणि इन्स्टाग्रामसारखी आधुनिक साधने आहेत; मात्र

बाप्पाच्या दर्शनासाठी Pune Metro सज्ज, गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; वाचा एका क्लिकवर वेळापत्रक

पुणे: गणेशोत्सवाच्या काळामध्ये, पुणेकरांना महामेट्रोकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई- पुण्यामध्ये गणेशोत्सवासाठी