तु बीसीसीआयचा अध्यक्ष होशील का? सचिनने दिलं मजेशीर उत्तर

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत महत्वाचं विधान केलं आहे. नवी दिल्लीत इंडिया टुडे कॉन्क्लेव २०२३ या सोहळ्यातील 'सचिनिझम अँड आयडिया ऑफ इंडिया' विशेष कार्यक्रमात सचिन तेंडुलकर बोलत होता.


सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि याआधीचे अध्यक्ष देखील माजी क्रिकेटपटू होते. मग भविष्यात तूही बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पाहायला मिळणार आहेस का? असं सचिनला विचारण्यात आलं असता त्यानं अगदी मजेशीर उत्तर दिलं.


"मी वेगवान गोलंदाजी करत नाही", असं सचिन म्हणाला. (रॉजर बिन्नी आणि सौरव गांगुली मध्यम गतीनं गोलंदाजी करायचे) एका दौऱ्यात जेव्हा गांगुलीनं विकेट्स घेतल्या होत्या तेव्हा तो 140kmph गतीनं गोलंदाजी करण्याचं सांगत होता. पण त्यानंतर त्याची कंबर दुखायला लागली होती, असं म्हणत सचिननं मी १४० च्या गतीनं गोलंदाजी करू शकत नाही असं मिश्किलपणे म्हटलं आणि बीसीसीआय अध्यक्षपदाच्या प्रश्नाला टाळलं.


सचिननं यावेळी हरभजन सिंग बाबत एक मजेशीर किस्साही सांगितला. सचिन म्हणाला, "मी जेव्हा पहिल्यांदाच मोहालीत हरभजनला पाहिलं होतं तेव्हा मला एकानं सांगितलं की भज्जी दुसरा खूप चांगला टाकतो. ही ९० च्या दशकातील गोष्ट आहे. प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर तो रनअपसाठी न जाता थेट माझ्याकडे यायचा. जेव्हा तो नंतर टीममध्ये आला तेव्हा मी त्याला विचारलं. तेव्हा मला कळालं की मी प्रत्येक बॉल खेळल्यानंतर हेल्मेट नीट करण्यासाठी डोकं हलवायचो तर हरभजनला वाटायचं की मी त्याला बोलावतोय. त्यामुळे तो प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर माझ्याजवळ यायचा". सचिनने हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Comments
Add Comment

PCB Major Changes : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठे फेरबदल होणार; आकिब जावेद आणि वहाब रियाझ यांना पदावरून हटवण्याची दाट शक्यता

नवी दिल्ली: पाकिस्तान क्रिकेटमधील ढासळलेला स्तर आणि सातत्यपूर्ण अपयशाची मालिका रोखण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट

Mukesh Kumar : भारतीय वेगवान गोलंदाज मुकेश कुमार पहिल्यांदाच काउंटी क्रिकेटमध्ये झळकणार; नॉटिंगहॅमशायरशी केला करार

नवी दिल्ली: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार २०२६ च्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये

Varun Chakravarthy : भारताला मोठा धक्का; फिरकीपटू वरुण चक्रवर्ती अफगाणिस्तान मालिकेमधून आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता

नवी दिल्ली:

US Open : अलेक्झांडर झ्वेरेव्हचे स्वप्नपूर्तीचे पर्व; शेल्टनला पराभूत करत पटकावले २०२६ चे अमेरिकन ओपन विजेतेपद

न्यूयॉर्क : जर्मनीचा स्टार टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव्हने शानदार खेळ करत २०२६ च्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम

IND vs AFG : अभिषेक शर्माचा तुफान जलवा; अर्शदीपच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा डाव कोलमडला, भारताचा ७ विकेट्सनी विजय

नवी दिल्ली : अभिषेक शर्माच्या वादळी अर्धशतकानंतर अर्शदीप सिंगच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने

Women’s Asia Cup 2026 : नक्वी प्रेझेंटेशनला आले, भारताने ट्रॉफीच घेतली नाही! मैदानात नेमकं काय घडलं?

दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा तब्बल ७२ धावांनी पराभव करत महिला आशिया चषकाचे विक्रमी आठवे