डॉ. आंबेडकर प्रतिमेचे नाणे पुन्हा सुरू करण्याची मागणी‎

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ‎. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा‎ असलेले नाणे जन्मशताब्दी‎ वर्षानिमित्त केंद्र सरकारने १९९० मध्ये चलनात‎ आणले होते. मात्र २३ वर्षानंतर सदर नाणे‎ आज चलनातून गायब झाले‎ असल्यामुळे पुन्हा ते नाणे बाजारात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न‎ करावेत, अशी मागणी आता आंबेडकरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जनतेमधून केली जात आहे.


भारताच्या इतिहासामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला तोड नाही. आपले संपूर्ण जीवन बाबासाहेबांनी दलित व अन्यायग्रस्त समाजासाठी खर्ची घातले. डॉ. बाबासाहेब थोर राजनीतिज्ञ, समाजसुधारक आणि अर्थतज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो. अशा या महान आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या आंबेडकरांच्या जन्मशताब्दी निमित्त १९९० मध्ये भारत सरकारने “भारतरत्न” हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. १९९०-९१ हे वर्ष आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष हे “सामाजिक न्याय वर्ष” म्हणुन साजरे करण्यात आले. तसेच केंद्र सरकारने या निमित्ताने १९९० साली‎ काढलेले ते एक रुपयांचे नाणे‎ आता बाजारातून गायब झाले आहे.‎


डॉ.‎ आंबेडकरांच्या जन्मशताब्दी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वर्षांनिमित्त काढलेले ते एक रुपयाचे नाणे बाजारात आले तेव्हा, कवी राजानंद गडपायले‎ यांचे रुपया बंदा निगाला यंदा, नव्या‎ जमान्यात भीमराव माझा बघून‎ घ्यावा आणि मन माझं गेलय आनंदून, माझा भीम यात पाहून, हे नाणं दिसतंया शोभून, बाबा साहेबांच्या फोटून... अशी अनेक गीतं संविधान निर्माते डॉ‎. बाबासाहेब आंबेडकर यांच्या‎ जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्वत्र‎ प्रचंड गाजली.


घराघरात ही गाणी आजही‎ वाजतात. अनेकांच्या ओठावर हे गाणे‎ सहज येऊ लागल्याने याचा जोरदार प्रचार‎ झाला. अनेकांना नाण्याविषयी‎ उत्सुकता लागली आणि डॉ. बाबासाहेब यांच्या प्रति असलेली श्रद्धा‎ म्हणून आंबेडकर अनुयायांनी हे‎ चलनी नाणे संग्रही ठेवले. अनेकांनी‎ त्याची फोटो फ्रेम करून देव्हाऱ्यात‎ ठेवल्याने हे नाणे बाजारात गेले नाही‎. त्यामुळे हे चलनी‎ नाणे बाजारात दिसेनासे झाले.‎


त्यामुळे पुन्हा यांची निर्मिती करत डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकरांचे ते एक रुपयाचे नाणे‎ बाजारात उपलब्ध करून घ्यावेत,‎ अशी मागणी आंबेडकरी जनतेतून‎ केली जात आहे.‎

Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर! अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा

महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी

Nanded Road Accident : नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! ट्रक-टाटा मॅजिकची जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू, ८ गंभीर

नांदेड : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड-भोकर मार्गावर ट्रक आणि टाटा मॅजिक प्रवासी व्हॅनचा

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने 'मोदी एक्सप्रेस' आज रवाना होणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली 'मोदी एक्सप्रेस' शुक्रवारी

Jalna Kunbi Certificate : जालना जिल्ह्यात १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण; ९९.९ टक्के अर्ज मंजूर झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

जालना : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणि कुणबी जात प्रमाणपत्र वितर

Maharashtra ports development : राज्यातील बंदरे आणि जलवाहतुकीला 'अर्थबळ' - १७० कोटींचा निधी मंजूर!

रस्ते, जेट्टी, पोहोचरस्ते आणि प्रवासी सुविधांच्या १०४ कामांना मंजुरी मुंबई : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील

Dhule : धुळ्यात बिबट्याचा थरार ! अंगणातून दोन वर्षीय चिमुकल्याला उचललं अन्.... हृदयद्रावक घटना

Dhule : शिरपूर तालुक्यातील अर्थे (बु.) शिवारात बिबट्याने दोन वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करून त्याला जबड्यात पकडून