राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट

जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील उन्हाचा पारा २ ते ३ अंशांची घसरून ४० अंशांवर आला होता. मात्र आज गुरुवारी राज्यातील सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.



जिल्ह्यात सोमवार (ता. ८) पासून तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी (ता. ९) तापमानाने चाळिशी पार करीत ४३.३ अंशांपर्यंत मजल मारली. बुधवारी (ता. १०) ४४.६ अंश तर आज गुरुवारी (दि. ११) ४४.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.



जळगावात आज गुरुवारी यंदाच्या‎ उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.८‎ तापमानाची नोंद शहरातील केंद्रीय‎ जल आयोग कार्यालयात झाली.‎ गेल्या तीन दिवसांतच शहराचे‎ कमाल तापमान तब्बल ४.३ अंशांनी‎ वाढल्याचे या नोंदीतून समोर आले.‎ पुढचे काही दिवस उष्णतेची लाट अशीच राहणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.

Comments
Add Comment

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Vishwa Hindu Parishad : दुर्गापूजा मंडपांमध्ये मांसाहारी पदार्थ टाळण्याचे विहिंपचे आवाहन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) पूजा आयोजकांसाठी

Mumbai Goa Highway : कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात वाहनांवर पाण्याची गळती सुरूच

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात भुयारी मार्गामध्ये

Water Purifier : दररोज सकाळी वॉटर प्युरिफायरचं पाणी पिण्याआधी ही गोष्ट नक्की करा!

मुंबई : सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाकघरात जाऊन पिण्यासाठी तांब्या भरणे असो किंवा मुलांच्या शाळेच्या आणि

Dahi Handi : संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव, १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक मिळणार

ठाणे : संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत दहीहंडी उत्सवाचे

Jalgaon Crime : दोन तरुणांशी वाद अन् बियर बार मालक सरपंचाचा हवेत गोळीबार , नेमकं काय घडलं ?

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे गुरुवारी रात्री हवेत गोळीबार केल्याच्या घटनेने खळबळ