म्हाडाच्या सोडतीला तुफान प्रतिसाद

मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनेतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ४ हजार ८३ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या हस्ते सोमवारी 'गो - लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. सोडतीचे अर्ज भरण्याचा शुभारंभ होताच पहिल्या तीन तासांत ६५५ अर्जदारांनी अर्ज केले. तर २०८ अर्जदारांनी याच वेळेत अनामत रक्कम भरल्याने मुंबई मंडळाच्या सोडतीला तुफान प्रतिसाद लाभल्याचे दिसत आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीकडे अर्जदारांनी पाठ फिरवली होती. ही सोडत पार पडताच मुंबई मंडळाने सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून अर्ज भरण्याचा शुभारंभ सोमवारपासून केला. या प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत कार्यक्रम १८ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात आयोजित करण्यात येणार आहे.



मुंबई मंडळाच्या सोडतीचा शुभारंभ केल्याच्या दहा मिनिटांमध्ये सुमारे ११५ अर्ज सोडत प्रणालीत प्राप्त झाले होते. तर सहा अर्जदारांनी अनामत रक्कम भरली होती. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५५ अर्जदारांनी अर्ज भरले. तर २०८ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीमध्ये प्रवेश निश्चित केला.



२२, मे रोजी दुपारी ३ वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय मंडळातर्फे नागरिकांकरीता खुला राहणार आहे. त्याचबरोबर २६ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. २८ जून रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस/एनइएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ४ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप यादीवर अर्जदारांना ७ जुलैपर्यंत हरकती दाखल करता येणार आहे. यानंतर १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने