सप्तशृंगीच्या दर्शनासाठी ड्रेस कोडला ग्रामस्थांची संमती

ठरावानंतर ट्रस्टला दिले निवेदन


सप्तशृंगी गड : अर्धे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर आई भगवतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड संहिता लागू करण्याच्या निर्णयाला ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी संमती दर्शवली असून याबाबतचा ठराव येथील ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. ठराव मंजूर केल्यानंतर तशा आशयाचे निवेदन वजा पत्र ग्रामपालिका सदस्यांनी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टला देऊन ड्रेस कोड लागू करण्याची मागणी केली आहे.


महाराष्ट्र मंदिर परिषदेने राज्यातील विविध मंदिरांमध्ये वस्र संहिता कार्यान्वित करण्याबाबतचा निर्णय घेतला असून त्यानंतर सप्तशृंगी गडावर ड्रेस कोड लागू होण्याबाबत मत - मतांतरे व्यक्त होत होती. गडावर ड्रेसकोड लागू केल्याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तथापि ट्रस्टचे व्यवस्थापक दहातोंडे यांनी या वृत्ताचे खंडण करून तो निर्णय अद्याप झाला नसल्याचे तसेच भारतीय प्रांतांची विविधता लक्षात घेऊन निर्णय होईल असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र आता ग्रामपालिकेने महाराष्ट्र मंदिर परिषदेच्या निर्णयाला पूरक असा ठराव करून ड्रेस कोड लागू करण्याबाबत भूमिका जाहीर केली आहे. या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या पुरुष व महिला भाविकांकडून सप्तशृंगी गडाचे पावित्र्य जपण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात यावा, अशी भूमिका ग्रामपालिकेने घेतली आहे. यासाठी सप्तशृंगी गड ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून मासिक मिटिंग ठराव निवेदन मंदिर प्रशासनाला देण्यात आले आहे.


यावेळी सप्तशृंगी गडाचे सरपंच रमेश पवार,सदस्य संदीप बेनके,कल्पना बर्डे,जयश्री गायकवाड हे निवेदन देताना उपस्थित होते. सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येतांना महिला /पुरुषांनी पूर्णांग पेहराव करून यावे, यासाठी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने धर्मादाय आयुक्त दरबारी पत्रव्यवहार करावा असे या निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

Pratiksha Tejankar : शासकीय कार्यालयात रील शूट करणे तहसीलदारांना भोवले; विशेष पथकामार्फत चौकशीचे आदेश

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या शासकीय कार्यालयातील ‘सिनेमॅटिक रील’

Jalgaon Accident News : शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटल्याने अपघात, दोन हमालांचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी ते पहूर

Pune Fire News : बाप्पाला निरोप देण्यासाठी कुटुंब बाहेर गेलं अन् इकडे घराला भीषण आग लागली, नेमकं काय घडलं ?

Pune Fire News : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यात गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबीयांच्या

Maharashtra weather : पावसाची उघडीप कायम! १६ सप्टेंबरला असं राहिल हवामान; शेतकरी संकटात

Maharashtra weather : महाराष्ट्रात सप्टेंबरच्या मध्यातही पावसाची उघडीप कायम असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवस बंगालच्या

Maharashtra Mahakhanij 2.0: खनिज चोरी रोखण्यासाठी महाराष्ट्रात 'डिजिटल' क्रांती; 'महाखनिज २.०' वेबसाईटचे लोकार्पण

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचे लोकार्पण

Amruta Fadnavis : गणरायाच्या दर्शनासाठी अमृता फडणवीस महापौर निवासस्थानी; तावडे कुटुंबीयांकडून स्वागत

मुंबई : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी १५