Nitesh Rane : खोटारड्या राऊतांचे संरक्षण काढा!

भाजप आमदार नितेश राणे यांची मागणी


मुंबई : काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी याबद्दल माहिती दिली होती. राऊत धमकी प्रकरणात मयुर शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर संजय राऊत यांना धमकी देणारा मयुर शिंदे हा सुनील राऊत यांचा कार्यकर्ता असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.



आरोपी मयूर शिंदे यांचे संजय राऊत आणि सुनील राऊत दोघांसोबतही भरपूर फोटो आहेत. वाढदिवसाचा केक भरवताना देखील मयूर शिंदेचा त्यांच्यासोबत फोटो आहे, असे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले.





"संजय राऊतांसारख्या खोटारड्या लोकांना महाराष्ट्र सरकारने दिलेले संरक्षण काढून टाकावे. यापुढे संजय राऊतवर महाराष्ट्राने किती विश्वास ठेवावा, याबद्दल खरंच विचार करावा लागेल. जो स्वत:च्या मालकाचा झाला नाही, स्वत:च्या धर्माचा झाला नाही तो तुमचा-आमचा काय होणार याचा विचार महाराष्ट्राने करावा," अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.


खोटं बोलणं राऊतांच्या रक्तातच आहे, असे आ. नितेश राणे यांनी म्हटले आहे. राऊत धमकी प्रकरणात अटक केलेला मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय आहे. राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी मयुर शिंदे याने धमकीचा कट रचला होता, असे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.


या संपूर्ण प्रकरणावर नितेश राणे म्हणाले, “राऊतांनी कार्यकर्त्याला धमकी देण्यास सांगून फोन रेकॉर्ड केला आहे. खोटं बोलणं हे राऊत यांच्या रक्तात आहे. संजय राऊत दाऊदपासून सगळ्यांची भाषा करतो. म्हणून मी याला भांडुपचा देवानंद म्हणतो. स्वत:च्याच कार्यकर्त्याकडून स्वत:लाच धमकी द्यायचा कॉल करवून घ्यायचा आणि आपल्याला धमकी मिळाल्याचे सांगून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची. हा संजय राऊत लवकरच तुम्हाला जेलमध्ये दिसणार आहे.”

Comments
Add Comment

IAS Transfers : सिंधुदुर्गच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. अपूर्वा बासूर, रवींद्र खेबुडकरांची पुण्यात बदली; राज्य शासनाकडून ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) ११ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

Orchid City Center Mall notice : ऑर्किड सिटी सेंटर मॉलमध्ये प्रवेशबंदी! सर्व गाळेधारक, दुकान मालकांना महापालिकेची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई सेंट्रल परिसरातील बेलासिस मार्गावरील ऑर्किड सिटी सेंटर मॉलसंदर्भात (Orchid City Center Mall)

Ophthalmologists proposal : ड्रायव्हिंग लायसन्समध्ये नेत्रदानाची संमती नोंदवण्याची मागणी; तज्ज्ञांचा सरकारला प्रस्ताव

मुंबई : भारतामध्ये कॉर्निया प्रत्यारोपणासाठी मोठी मागणी असताना उपलब्ध नेत्रदानाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

FDA Festive Calendar : सण-उत्सवात अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी 'एफडीए'कडून वार्षिक कॅलेंडर

सर्व धर्मीयांच्या महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘स्थायी आदेश’ जारी मुंबई :

Sawantwadi Express : 'सावंतवाडी एक्स्प्रेस'ला उपमुख्यमंत्री शिंदे, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर, मंत्री नितेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट; खा. नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई :

Nitesh Rane : २०२८ पासून मुंबई वॉटर मेट्रो सुरू होणार, पालघरपर्यंत विस्तार करण्याचे नियोजन; मंत्री नितेश राणे यांची माहिती

महाराष्ट्राने समुद्राकडे 'विकासाचे दालन' म्हणून पाहण्याची गरज  मुंबई : ८७७ किलोमीटरची किनारपट्टी, असंख्य नद्या