Traitor day : भाजप आमदार नितेश राणेंनी केली २७ जुलै 'देशद्रोही दिन' म्हणून साजरा करण्याची मागणी

आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा देशद्रोही या दिवशी जन्माला आला : नितेश राणे


मुंबई : भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) २७ जुलै हा उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस 'देशद्रोही दिन' म्हणून साजरा करण्याची मागणी आज सकाळी ट्विटद्वारे केली आहे. तसेच ही मागणी करणारा एक व्हिडीओदेखाल त्यांनी समाजमाध्यमांवर (Social Media) शेअर केला आहे. आजवर पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या सर्वात मोठ्या गद्दारांपैकी एक गद्दार या दिवशी जन्माला आला, यामुळे या दिवसाला 'देशद्रोही दिन' म्हटले जावे, अशी खळबळजनक मागणी नितेश राणेंनी केली आहे.


नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, कृपया २७ जुलै हा 'देशद्रोही दिवस' ​म्हणून घोषित करा. आजवर पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या सर्वात मोठ्या गद्दारांपैकी एक या दिवशी जन्माला आला. महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्ती असलेल्या आपल्याच वडिलांच्या पाठीत त्याने वार केले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याच्या आपल्या घाणेरड्या महत्त्वाकांक्षेसाठी त्याने भाजपसारख्या जवळच्या मित्राच्या पाठीत आणि स्वतःच्या धर्मावर वार केले. त्याने मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भ्रष्टाचार करून करोडो पैसे कमवले. म्हणून मी २७ जुलै हा दिवस देशद्रोही दिन म्हणून घोषित करण्याचे आवाहन करत आहे, जेणेकरुन अख्ख्या जगाला त्याची आठवण होईल आणि त्याला दररोज शाप दिले जातील.





ठाकरे गट साजरा करणार होता खोके दिन

महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करुन नवी शिवसेना (Shivsena) स्थापन केली त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना 'स्वाभिमान दिन' (Swabhiman din) साजरा करणार आहे, तर ठाकरे गटाने हा दिवस 'जागतिक खोके दिन' म्हणून साजरा करायचे ठरवले आहे.


मात्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेला हानी पोहोचू नये याकरता मुंबई पोलिसांनी ठाकरे गटाच्या खोके दिनाला प्रतिबंध करुन त्यांचा मानस हाणून पाडला आहे. तशा नोटिसाच ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांसह माजी नगरसेवकांना व पदाधिका-यांना पाठवण्यात आल्या आहेत. याचाच पाठपुरावा करत २७ जुलै 'देशद्रोही दिन' म्हणून घोषित करण्याची नवी मागणी करुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत