Patna Opposition Meeting : मोदी हटाओ नही, परिवार बचाओ बैठक

देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका


मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची आज बिहारमधील पाटणा येथे बैठक (Patna Opposition Meeting) आयोजित करण्यात आली होती. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) नाव जगभर गाजत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षांना हे पाहवत नसल्याने ते आज एकत्र आले आहेत. हाच धागा पकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी या बैठकीचा 'मोदी हटाओ नही, परिवार बचाओ बैठक', असा उल्लेख करत जोरदार टीका केली.


आज पाटणामध्ये सगळे परिवारवादी पक्ष एकत्र आले आहेत आणि आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे कशी सत्ता राहू शकेल हा त्यांचा हेतू आहे. कारण यांच्यासाठी राज्य चालवणं हा धंदा आहे, तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ती सेवा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


पुढे ते म्हणाले, मागच्याही काळामध्ये २०१९ ला या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन पाहिलं होतं पण जनता मोदीजींच्याच पाठीशी आहे आणि आता तर २०२४ मध्ये मागच्या वेळेपेक्षाही जास्त ताकदीने जनता मोदीजी आणि एनडीए (NDA) पक्षाच्या पाठीशी उभी राहील. त्यामुळे अशा प्रकारचे कितीही मेळावे विरोधकांनी केले तरी त्याचा परिणाम होईल, असं मला वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.



उद्धव ठाकरेंना केले लक्ष्य

देवेंद्र फडणवीस म्हणाले, एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की सातत्याने मेहबुबा मुफ्तींच्या नावावर भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आता मेहबुबा मुफ्तींसोबत तर चाललेच आहेत पण त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. त्यामुळे सत्तेकरता आणि परिवार वाचवण्याकरता सगळ्या प्रकारच्या तडजोडी करण्यासाठी हे तयार आहेत, पण याचा कुठलाही परिणाम होईल, असं मला बिल्कुल वाटत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरदेखील निशाणा साधला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर