Patna Opposition Meeting : विरोधकांना चिंता मुलाबाळांची : चंद्रशेखर बावनकुळे

आशिष शेलार व संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका


पाटण्यात आज विरोधी पक्षांची बैठक


मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना खडबडून जाग आली आसून आज अकरा वाजल्यापासून ते बिहारमधील पाटण्यामध्ये (Patna Opposition Meeting) बैठक घेणार आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) नाव जगभर गाजत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षांना हे पाहवत नसल्याने ते आज एकत्र येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी 'विरोधकांना चिंता मुलाबाळांची' असं म्हणत विरोधकांची खिल्ली उडवली. तर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) व भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पाटण्यात आजच्या बैठकीला उपस्थित राहणारे उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.


विरोधकांच्या बैठकीला लक्ष्य करत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "नरेंद्र मोदीजींनी आपल्या भाषणात म्हटलं की माझा सन्मान म्हणजे १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. एकीकडे पंतप्रधान भारताला उंची देण्याचं काम करत असताना दुसरीकडे विरोधक पाटण्याला एकत्र येत आहेत. खरं तर विरोधकांचं त्यांच्या मुलाबाळांची चिंता करण्याकरता एकत्रीकरण सुरु आहे. सोनिया गांधींना राहुल गांधी मुख्यमंत्री हवे आहेत, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना पुढे आणायचंय, उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंची चिंता आहे, त्यामुळे विरोधकांनी जरी एकत्र मुठी बांधल्या तरी त्यांना मुलाबाळांची चिंता आहे म्हणून ते हे करत आहेत", अशी जोरदार टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली.



आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंवर तिखट प्रश्नांची सरबत्ती

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) थेट आव्हान दिलं. औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर? उस्मानाबाद की धाराशिव? अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यानगर? काँग्रेस की हिंदुत्व? कबर की स्मारक? औरंगजेब की सावरकर? असे प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केले आणि याच प्रश्नांची होर्डिंग्ज लावून ते उद्धव ठाकरेंना थेट सवाल करणार आहेत असं त्यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटलं आहे.





दुसर्‍याची गद्दारी आणि स्वतःची देशभक्ती : संदीप देशपांडे

ज्या मेहबुबा मुफ्तींनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं म्हणून तुम्ही आयुष्यभर टोमणे मारले, त्याच मेहबुबा मुफ्तींसोबत तुम्ही आज बैठकीसाठी बाजूला बसणार आहात का? असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडेंनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, याचा अर्थ दुसर्‍याने केली तर ती गद्दारी आणि स्वतः केली तर ती देशभक्ती अशी दुहेरी भूमिका कशी काय कोणाची असू शकते? स्वतःच्या स्वार्थाची वेळ आली की वेगळे निकष आणि दुसर्‍यांसाठी वेगळे निकष, असा टोलाही त्यांनी लगावला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म