Rohini Khadse : जळगावात मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शने करणाऱ्या रोहिणी खडसेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी धरपकड


जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress Party) राज्यात कापूस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली असता, पोलिसांनी धरपकड केली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.


जिल्ह्यातील मंजूर प्रकल्प अन्यत्र पळविले जाणे, भीषण टंचाई, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या सर्व प्रश्‍नांवर कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिला होता. कापसाला भाव नसल्याने निम्म्याहून अधिक कापूस आजही शेतकऱ्यांच्या घरात आहे. कांदा उत्पादक मेटाकुटीस आला आहे. जिल्ह्यातील प्रकल्प अन्य जिल्ह्यांमध्ये पळवून लावणे, कायदा-सुव्यवस्थेसह पाणीटंचाईवर शासन गंभीर नाही. या सर्व प्रश्‍नांबाबत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. त्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी काळे झेंडे जप्त करून निदर्शने करणाऱ्यांना ताब्यात घेतले. यात रोहिणी खडसे यांचाही समावेश आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा