Devendra Fadanvis: सुशांत प्रकरणाबद्दल देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट, तपास सुरुच! कारण....

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियन (Disha salian) यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये  मोठा गौप्यस्फोट केला आहे.


एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत विचारण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं,  या प्रकरणाची जी काही माहिती उपलब्ध होती ती ऐकीव माहिती होती. मात्र, नंतर काही लोकांनी सांगितले की, त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित काही ठोस पुरावे आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलून ते पुरावे पोलिसांकडे देण्यास सांगितले आहे. सध्या उपलब्ध असलेले सर्व पुरावे बरोबर आहेत की नाही, हे तपासले जात आहे. तपास सुरू आहे, त्यामुळे त्याच्या निकालावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. योग्य वेळ आल्यावर मी याबद्दल बोलेन  असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.



जाणून घ्या सुशांत प्रकरणात संशय का वाढला?


यावर्षी जानेवारी महिन्यात सुशांत प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली होती. अभिनेत्याच्या शवविच्छेदनादरम्यान उपस्थित असलेले शवविच्छेदन कर्मचारी रूपकुमार शाह यांनी दावा केला की सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे.


त्यांनी सांगितले की, सुशांतचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आणला असता त्याच्या मानेवर आणि शरीराच्या काही भागावर जखमांच्या खुणा होत्या. रूपकुमार यांना याबाबत वरिष्ठांशी बोलायचे होते, मात्र त्यांनी याबाबत नंतर बोलू, असे सांगितले.


तसेच, शवविच्छेदन कर्मचार्‍यांनी सांगितले की  सुशांतच्या मृत्यूच्या वेळी कूपर रुग्णालयात पाच मृतदेह होते. यातील एक मृतदेह व्हीआयपीचा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय लिहायचे हे डॉक्टरांचे काम आहे, पण सुशांतचे फोटो पाहून कोणीही म्हणू शकेल की त्याची हत्या झाली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने