Governmental Help : नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आता पाच हजारांऐवजी दहा हजारांची मदत

अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा


मुंबई : राज्यात पावसाने माजवलेल्या हाहाकारामुळे (Heavy rainfall) अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी पावसाच्या आगमनाने आनंदलेला शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला (Vidarbha and marathwada) तर याचा जोरदार फटका बसला आहे. या प्रश्नाबाबत विरोधकांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यावर शासनाकडून तातडीने निर्णय घेण्यात आला असून याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.


पावसाळी अधिवेशनादरम्यान आज विधानपरिषदेमध्ये निवेदन सादर करताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पाच हजार ऐवजी १० हजारांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. अजित पवार म्हणाले, अन्नधान्य व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दुर्घटनेचा प्रसंग घडला तर ताबडतोब त्या ठिकाणी धान्य पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांना धान्य शिजवणं शक्य नसेल त्यांना शिजवलेले धान्य बंद पॅकेट्समधून वाटण्यात येईल. तसेच पुराच्या ठिकाणी रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छता करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.


अजित पवार म्हणाले की, २३ जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, अकोला या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले होते. अशा ठिकाणी बचाव कार्य करण्यात आले आहे. याठिकाणी मंत्र्यांनी भेटीही दिल्या आहेत. वायुदल, एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) यांची मदत घेऊन अनेक लोकांना वाचवण्यात आले आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार धावले आहे. तसेच जिल्ह्यातील पिकांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने