Ram Mandir Inauguration : ठरलं! 'या' तारखेला होणार अयोध्येच्या राम मंदिराचे उद्घाटन

पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे कळवली तारीख


अयोध्या : अनेक हिंदूंच्या स्वप्नातील भव्यदिव्य अशा अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचे बांधकाम आता पूर्ण होत आले आहे. मागील काही दिवस राम मंदिराचे उद्घाटन (Ram Mandir Inauguration) जानेवारी महिन्यात होईल, अशा चर्चा होत होत्या. आता याबाबतची तारीख समोर आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे आंतरराष्ट्रीय कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरी (Swami Govind Giri) यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच मुहूर्ताच्या तारखा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाठवण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्वामी गोविंद गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे, उद्घाटनाची तारीख २१ ते २३ जानेवारी दरम्यान निवडली जाईल. यातील एक तारीख पंतप्रधान मोदीजीच निवडतील, जेणेकरून उद्घाटनाच्या वेळी ते उपस्थित राहू शकतील, असं स्वामी गोविंद गिरी म्हणाले. यासोबतच सर्व संप्रदायातील संत-मुनींना उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, शिवाय उद्घाटनाच्या दिवशी मुख्य कार्यक्रमाला फक्त संत महात्माच उपस्थित राहतील, असा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले.


मंगळवारी सायंकाळी ट्रस्टचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष कंखल मठात पोहोचले आणि त्यांनी शंकराचार्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानुसार मुख्य कार्यक्रम संक्षिप्त असणार आहे, ज्यात फक्त संत महात्म्यांची उपस्थिती असेल. मंदिरात अभिषेक झाल्यानंतर राष्ट्र आणि जगासाठी एक औपचारिक कार्यक्रम आयोजित केला जाईल. संतांच्या दर्शनानंतर मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे.



देशभरात होणार अयोध्येचे वातावरण


ट्रस्टचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणाले की, देशातील सर्व राज्यांमधून अयोध्येपर्यंत विशेष ट्रेन चालवण्याची योजना आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्यावेळी देशात अयोध्येचे वातावरण निर्माण झाले पाहिजे, त्यासाठी प्रतिष्ठानच्या सात दिवस अगोदर लोकांनी विविध प्रकारे नाविन्यपूर्ण सादरीकरण करावे, असे आवाहन संपूर्ण देशाला केले जाणार आहे. रामलीला, रामकथेसह अनेक प्रकारचे उत्सव आयोजित केले पाहिजेत. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सात दिवस आधी आणि उद्घाटनानंतर सात दिवस असेच वातावरण राम मंदिराच्या उद्घाटनाला राहणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी