Nitesh Rane and Abu Azmi : नितेश राणे मागे आल्याचे पाहून अबू आझमी आणि रईस शेख पळाले...

औरंगजेब स्टेटसवरुन सभागृहात गदारोळ... पण सभागृहाबाहेर जे घडलं... 


मुंबई : औरंगजेब स्टेटसप्रकरणी (Aurangzeb status) आज विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) प्रचंड आक्रमक झाले. आपल्या राज्यामध्ये असे काही लोक आहेत जे वंदे मातरम म्हणत नाहीत पण जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा 'सर तन से जुदा' आणि 'औरंग्या माझा बाप आहे', अशा घोषणा देतात. हे राज्याचं वातावरण खराब करतात. या लोकांना शिवरायांच्या राज्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही. असंच असेल तर पाकिस्तानात निघून जा, इथे का राहता? असा सवाल करत अब्बु आझमी (Abbu Azmi) आणि रईस शेख (Rais Shaikh) यांना उददेशून नितेश राणे गददार म्हणाले.


यावर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख हे सभागृहाबाहेर पत्रकार परिषद घेत होते. यावेळी रईस शेख यांनी नितेश राणेंवर टीका केली. गेल्यावेळीही राणेंनी मला गद्दार म्हटलेले, आताही त्यांनी गद्दार म्हटलेय. ही त्यांनी मानसिकता आहे. त्यांच्या डोक्यात हे भरलेले आहे. या मानसिकतेविरोधात लढण्याची गरज आहे, असे शेख म्हणाले.


शेख हे सर्व बोलत असताना नितेश राणे त्यांच्या मागेच उभे होते. नितेश राणे यांनी खुणेनेच एका पत्रकाराला 'त्यांना सांग मी मागेच उभा आहे', असा इशारा केला. शेख यांना हे समजताच त्यांनी मागे वळून पाहिले आणि बोलणे थांबवले. यावर ते नितेश राणे यांना 'आपने ऐसा कहा या नही' अशी विचारणा करत होते. नितेश राणे यांनी त्यावर 'तो और क्या कहेंगे?' अशी प्रतिक्रिया देत शेख यांना गप्प केले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने