Aurangzeb status : असंच असेल तर पाकिस्तानात निघून जा, इथे का राहता?

औरंगजेबाच्या स्टेटसवरुन विधानसभेत गदारोळ.... नितेश राणे झाले आक्रमक


मुंबई : आपल्या राज्यामध्ये असे काही लोक आहेत जे वंदे मातरम म्हणत नाहीत पण जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा 'सर तन से जुदा' आणि 'औरंग्या माझा बाप आहे', अशा घोषणा देणारे हे लोक आहेत. हे राज्याचं वातावरण खराब करतात. या लोकांना शिवरायांच्या राज्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही. असंच असेल तर पाकिस्तानात निघून जा, इथे का राहता? असा सवाल करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh rane)विधानसभेत प्रचंड आक्रमक झाले. यावेळेस अब्बु आझमी (Abbu Azmi) आणि रईस शेख (Rais Shaikh) यांना उददेशून नितेश राणे गद्दार म्हणाले.


पुढे नितेश राणे म्हणाले, तुम्ही आमच्या मतांवर निवडून येता आणि इथे येऊन धिंगाणा घालता? यावेळेस नितेश राणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एस. आय. टी. स्थापन करण्याची विनंती केली. शिवाय ते म्हणाले की आपल्याच विभागाचे काही लोक, काही सडके आंबे अशा प्रकारच्या लोकांना मदत करतात. या लोकांच्या विरोधातही चौकशी होणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नितेश राणे यांच्या प्रश्नाचे समाधान केले. एस. आय. टी. स्थापन केली जाईल तसेच औरंगजेब स्टेटस प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली जाईल असं ते म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या विकासाकरता दंगे होणं, एखादा सामाजिक तणाव असणं हे योग्य नाही. आपण एक प्रागतिक राज्य आहोत त्यामुळे आपल्या प्रगतीवरही याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे एस. आय. टी. द्वारे योग्य चौकशी केली दोईल. त्याचप्रमाणे एखादा मिटण्याची शक्यता असतानाही तो मिटवण्यात पोलिसांकडून दिरंगाई झाली असेल तर त्यावरही योग्य चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले जातील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने