Hirkani Kaksha : मोठा निर्णय! आता कार्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्येही असणार 'हिरकणी कक्ष'

हिरकणी कक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय


मुंबई : गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी सरकारी कार्यालये, बस स्थानक आणि रेल्वे स्थानकांवर हिरकणी कक्ष असतो. महिलांना विश्रांतीसाठी, बाळाला दूध पाजण्यासाठी या कक्षाचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वी एका महिला आमदाराने हिरकणी कक्षाच्या दुरावस्थेबाबत केलेल्या तक्रारीमुळे राज्यभरातील बस स्थानकं तसेच रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या हिरकणी कक्षांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. अशाच प्रकारचा एक कक्ष सर्व कार्यालयांमध्ये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने मांडला आहे.


गेल्या आठवड्यात राज्याच्या नगरविकास विभागाने एक मसुदा अधिसूचना जारी केली होती. या माध्यमातून अशा 'लेडीज रुम' उभारण्याबाबत संबंधितांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. या लेडीज रुमलाही 'हिरकणी कक्ष' असंच म्हटलं जाणार आहे.


नगरविकास विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच कार्यालयांमध्ये लहान मुलांसह काम करणाऱ्या मातांचे प्रमाण भरपूर आहे. मात्र त्यांना विश्रांतीसाठी, बाळाला दूध पाजण्यासाठी कोणतीही विशिष्ट जागा नसते. त्यामुळे राज्य सरकारने नियमात बदल करून, अशा सर्व आस्थापनांमध्ये गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी विशेष कक्ष उभारणं गरजेचं आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले.



कोणत्या कार्यालयांचा समावेश?


या अधिसूचनेमध्ये दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक, सार्वजनिक, निमसार्वजनिक, संस्थात्मक, शैक्षणिक आणि अशा कार्यालयांसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व इमारतींमध्ये वेगळी 'लेडीज रुम' उपलब्ध करणे बंधनकारक असेल. सर्व गरोदर माता, स्तनदा माता आणि सहा वर्षांखालील मुलं असणाऱ्या महिलांसाठी ही जागा वापरण्याची परवानगी असेल.



'या' घटनेमुळे सरकारला आली जाग


यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सरोज अहिरे या आपल्या लहान बाळाला घेऊन आल्या होत्या. मात्र, त्यावेळी तेथील हिरकणी कक्ष अगदी दुरावस्थेत होता. त्यांच्या तक्रारीनंतर विधान भवनातील हिरकणी कक्ष सुधारण्यात आला. यानंतर राज्य सरकारला जाग आली होती, आणि राज्यभरातील बस स्थानकं तसेच रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या हिरकणी कक्षांचीही तपासणी करण्यात आली होती. यानंतर आता राज्य सरकारने हे आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने